मनोरंजन

…म्हणून साई पल्लवीने धुडकावलं 2 कोटी रुपयांचं मानधन

मुंबई | दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने सौंदर्याची एक नवीन परिभाषा मांडली. सौंदर्य म्हणजे बाह्यरुप नाही तर तुमचा आत्मविश्वास हेच खरं सौंदर्य असल्याचं तिने म्हटलं आहे.

कलाकार म्हटलं की बऱ्याचदा ते चित्रपटांव्यतिरिक्त एखाद्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये झळकल्याचं पाहायला मिळतात. मात्र साई पल्लवी या जाहिरातींना स्पष्टपणे नकार देत असून एकदा तिने तब्बल 2 कोटींची ऑफर नाकारल्याचं पाहायला मिळालं होतं.

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीला एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी विचारणा करण्यात आली होती. या जाहिरातीसाठी तिला तब्बल 2 कोटी रुपयांचं मानधनही मिळणार होतं. मात्र साई पल्लवीने एवढ्या कोट्यावधी रुपयांचं मानधन धुडकावून लावत ही जाहिरात नाकारली आहे.

दरम्यान, मी स्वत: सौंदर्य प्रसाधनांना पाठीशी घालत नाही. तुम्ही स्वत:विषयी, त्वचेच्या रंगाविषयी आत्मविश्वास बाळगायला हवा, असं साई पल्लवीने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कौतुकास्पद! शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला महिन्याभराचा पगार

-केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार, कामगारांना पायी जाण्यापासून रोखा- देवेंद्र फडणवीस

-लॉकडाऊनमुळे राज्यभरात अडकलेल्या नागरिकांना ST मोफत गावी पोहोचवणार; ‘या’ अटींसह प्रवास शक्य

-80 वर्षीय वडिलांना खांद्यावर घेऊन मजुराचा मुलुंड ते वाशिम 350 किमी पायी प्रवास

-काही लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली पण…- अमित शहा