पुणे | बैलगाडा शर्यतीवरून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्यात शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळत आहे.
लोकसभेच्या निवडणुक प्रचारा दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन खासदार कोल्हे यांनी दिले होते. कोल्हेंच्या या आश्वासनाची आठवण करुन देत आढाळरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुलं आव्हान दिलं.
खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असं त्यांनी म्हटलं होत.
डॉ. अमोल कोल्हे यांनीही रुबाबदार एंट्री मारत घोडी धरून आढळराव पाटलांनी दिलेलं आव्हान पूर्ण केलं. यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.
ज्यांना बैलगाडा शर्यत माहिती नाही त्यांना असं वाटतं की अमोल कोल्हेंनी शब्द पाळला. त्यांनी शब्द पाळला नाही, त्यांनी माझं आव्हान स्विकारलं नाही. माझं आव्हान स्विकारण्याची हिंमत डॉ. कोल्हेंमध्ये नाही, असा घणाघात आढळराव पाटलांनी केला आहे.
अमोल कोल्हेंनी मारलेली बारी पहिली नसल्याचं म्हणत आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर टीकेची झोड उठवली आहे. शब्द पाळला वैगेरे हे थोतांड आहे. पुणे आणि नगरचा विचार करता पहिली बारी मावळ आणि आंबेगाव तालुक्यात 11 आणि 12 फेब्रुवारीला झाल्या होत्या. ती खरी पहिली बारी, तेव्हा तो पठ्ठ्या कुठे होता?, असा सवाल आढळराव पाटलांनी उपस्थित केला आहे.
बारी म्हणजे काय? घाटातून सुटलेला पहिला गाडा. आज हे गृहस्थ आले 12 वाजता. तोपर्यंत 100 गाडे पळाले होते. त्यामुळे ही पहिली बारी नाही. शब्द दिला, आश्वासन दिले, नाटकातील शब्दफेकी डायलॉग आहेत. गर्दीला खेचून घेणारे हे डायलॉग आहेत. यात काही तथ्य नाही. ज्यांना बैलगाडा शर्यत माहित नाही. त्यांना वाटतं अमोल कोल्हेंनी शब्द पाळला. त्यांनी शब्द पाळलेला नाही, लोकांची फसवणूक केली आहे, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”
Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या
“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”
अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!
“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”