मुंबई | देशातील कोरोना (Corona) परिस्थिती आता हळूहळू आटोक्यात येत आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाने थैमान घातलं होतं. त्यानंतर देशात तीन कोरोनाच्या लाटा येऊन गेल्या.
कोरोनाच्या या तिन्ही लाटेत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. लसीकरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता कोरोनाची आघात आता कमी होत आहे. अशातच आता सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
देशात कोरोनाची चौथी लाट आली तरी ती सौम्य राहील, असा दावा अदर पुनावाला यांनी केला आहे. प्रवास करताना प्रत्येकाला बुस्टर डोस आवश्यक असल्याचं देखील अदर पुनावाला म्हणाले आहेत.
बुस्टर डोससाठी केंद्र सरकारला याबद्दल विनंती केली असल्याचं देखील पुनावाला यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर लसींचा पुरेसा साठा असून कमतरता भासणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
चीनमध्ये कोरोना महामारीमुळे अनेक शहरांमध्ये लाॅकडाऊन लावण्यात आलं आहे. त्यामुळे आता भारतात देखील याचा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने मास्क आणि सोशल डिस्टंसिंग वगळता इतर निर्बंध हटवले आहेत. तर महाराष्ट्रात देखील मास्क ऐच्छिक करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांचे राजीनामे
“गद्दारी ती गद्दारीच, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी…”, नारायण राणे कडाडले
पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
…तर चंद्रकांतदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करू – संजय राऊत
सिगारेट पिणाऱ्यांनो… वेळीच व्हा सावध, नाहीतर डोळेही गमावून बसाल