शिवस्वराज्य यात्रा संपली की राष्ट्रवादीही संपेल; आढळराव पाटलांचा घणाघात

पिंपरी चिंचवड | शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. कोल्हे महाराष्ट्रातले किती-किती मतदारसंघ फिरतायेत.. लोकांना माझ्याबाबत चुकीचं माहिती सांगून भावनेचं राजकारण केलं… कुठं आहेत ते आता?? ते जिथे जातायेत तिथले लोकं पक्ष सोडून चाललेत. शिवस्वराज्य यात्रा संपली की राष्ट्रवादीही संपेल, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावावर भावनेचं आणि जातीय राजकारण केलं गेलं, अशी टीका त्यांनी कोल्हेंवर केली.

अमोल कोल्हेंना निवडून देऊन लोकांना पश्चाताप झालाय. त्यांनी मतदारसंघात भावनेचं आणि जातीय समिकरणाने राजकारण केले, असा आरोप त्यांनी कोल्हेंवर केला.

संसदेच्या 37 दिवसांत 18 दिवस ते संसदेत होते. बाकीचे 19 दिवस ते गैरहजर होते. मतदारसंघात देखील ते नाहीयेत. किती वेळा ते भोसरीत आले?? असा प्रश्न त्यांनी उपस्थित लोकांना विचारला. लोकांनाच आता याचा पश्चाताप झालाय, असं ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना आढळरावांनी महेश लांडगेंना शिवसेनेकडून लढण्याची ऑफर देखील दिली.

महत्वाच्या बातम्या-