पुणे महाराष्ट्र

घोडीवरून येणाऱ्यांकडून बैलगाड्याचा प्रश्न सुटणार नाही; आढळरावांचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र

शिरूर |  शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले. यांच्यात निकाराचं राजकीय युद्ध झालं. सरतेशेवटी कोल्हे जिंकले. पण आता मात्र चालू झालंय या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध आणि त्याचा प्रमुख मुद्दा ठरलाय बैलगाडा शर्यत…

घोडीवरून येणाऱ्यांकडून बैलगाड्याचा प्रश्न सुटणार नाही, असं म्हणत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

तुमचा खासदार 15 दिवसामध्ये बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सोडवून घोडीवर बसून येणार होता…. आता त्याचं काय झालं?? असा सवालही त्यांनी विचारला आहे. 

आढळरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. बांदल, मोहिते हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मारामाऱ्या, दंगली तुम्ही घडवायच्या, जमीन व्यवहारातून लोकांची फसवणूक तुम्ही करायची, खंडणी तुम्ही गोळा करायची आणि पोलिसांनी कारवाई केल्यावर नाव आढळराव पाटलांचं घ्यायचं, हे कुठलं राजकारण? अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.

आढळरावांनी पाटलांनी अजित पवार यांनादेखील लक्ष्य केलं. मस्ती माझी नाही तर तुमची जिरलीय… मुलाचा पराभव झाल्याने तोंड कुणाचं काळवंडलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय, अशा शब्दात अजित पवार यांना आढळरावांनी प्रत्युत्तर दिलंय.

शरद पवार येऊ द्या किंवा अजित पवार येऊ द्या… असं म्हणणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटलांची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मस्तीच जिरली, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. 

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिक आजही त्यांचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात. त्यांना खात्री असते दादांकडे गेल्यावर माझं काम होणार, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवार यांच्या बोचऱ्या टीकेला आढळराव पाटलांचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणतात…

-मोटारीवर कव्हर, आत प्रेमीयुगूलाचे चाळे; आजीबाईंच्या एका शंकेनं बिंग फुटलं!

-आई नको म्हणत होती…. मित्र आले अन् घेऊन गेले… पण आता तो कधीच परत येणार नाही!

जागावाटपाबद्दल चंद्रकांत पाटलांनी बोलू नये- संजय राऊत

-…अन् पिडितांना भेटण्यासाठी प्रियांका गांधींनी अख्खी रात्र जागून काढली!

IMPIMP