“पुणे जिल्ह्याचा सातबारा आता अजित पवारांच्या नावे करा”

पुणे | पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junnar) तालुक्यात बिबट्या सफारीवरून राजकारण (Politics) पेटलं आहे. स्थानिक नागरिकही आता आक्रमक झाले आहेत. आता यावरून भाजप नेत्या आशा बुचके यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय.

प्रत्येक गोष्ट बारामतीला पळवण्याचा प्रकार खपवून घेणार नाही. ही सफारी बारामतीला जाणार हे ऐकून माझं टाळकं हललं आहे, असं म्हणत आशा बुचके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.

बिबट सफारी बाहेर नेणाऱ्याने डोक्यातून हे वेड काढून टाकावं. बिबट्या हा जुन्नरचा वारसा आहे, अशा शब्दांत भाजपा नेत्या आशा बुचके यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

पुणे जिल्ह्याचा सातबारा आता पवारांच्या नावे करा, असंही त्या म्हणाल्यात. तसेच हा बिबट प्रकल्प येथून गेला तर तालुक्याची अस्मिता आणि उर्जा संपुष्टात येईल, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

जुन्नरचे आमदार-खासदार झोपेत आहेत, तुमच्या डोळ्यादेखत बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला गेला कसा, असा सवाल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यात पवारांची सत्ता असल्याच्या धुंदीत हे लोक आहेत. शिवसेनेला ताकद मिळू नये, अशी त्यांची वागणूक आहे, असंही आढ‌ळराव म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

Russia-Ukraine War | युद्ध आणखी भडकणार?, ‘या’ देशाची युक्रेनला मोठी मदत 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

  देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”

  पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…