पुणे महाराष्ट्र

अजित पवार यांच्या बोचऱ्या टीकेला आढळराव पाटलांचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणतात…

पुणे |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बोचऱ्या टीकेला शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. मस्ती माझी नाही तर तुमची जिरलीय… मुलाचा पराभव झाल्याने तोंड कुणाचं काळवंडलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय, अशा शब्दात अजित पवार यांना आढळरावांनी प्रत्युत्तर दिलंय.

माझ्या पक्षाचे 18 खासदार आहेत आणि तुमच्या पक्षाचे 4 खासदार आहेत. जरा आत्मचिंतन करा. ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही त्याने माझ्यावर टीका करणे बरोबर नाही, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.

मी अतिशय सामान्य घारातून आलेलो आहे. माझे काका मुख्यमंत्री किंवा केंद्रिय कृषीमंत्री नव्हते. मी पराभूत जरी झालो असलो तरी शिवसेनेने माझा योग्य सन्मान केला आहे. तुम्ही तुमचं बघा उगीचच इकडं तिकचं डोकावू नका, असा सल्लाही त्यांनी अजित पवारांना दिला.

अजित पवारांनी माझ्या पराभवाची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या मुलाच्या पराभवाच्या वेदनेतून बाहेर येऊन वास्तव स्विकारावे, असंही ते म्हणाले.

शरद पवार येऊ द्या किंवा अजित पवार येऊ द्या… असं म्हणणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटलांची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मस्तीच जिरली, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. 

दरम्यान, अजित पवारांच्या टीकेला आढळरावांनी जशास तसं प्रत्युत्तर दिल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि राष्ट्रवादीतील ही जुगलबंदी चांगलीच रंगणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोटारीवर कव्हर, आत प्रेमीयुगूलाचे चाळे; आजीबाईंच्या एका शंकेनं बिंग फुटलं!

-आई नको म्हणत होती…. मित्र आले अन् घेऊन गेले… पण आता तो कधीच परत येणार नाही!

जागावाटपाबद्दल चंद्रकांत पाटलांनी बोलू नये- संजय राऊत

-…अन् पिडितांना भेटण्यासाठी प्रियांका गांधींनी अख्खी रात्र जागून काढली!

-आम्ही दोघी संसदेत का हसलो???, अखेर रक्षा खडसेंनी सांगितलं कारण

IMPIMP