पुणे महाराष्ट्र

अजित पवार घरभेदी; स्वतःच्या दिवट्यासाठी पवार साहेबांनाही अव्हेरलं!

शिरूर |  पार्थला उमेदवारी द्यायला शरद पवारांचा विरोध होता. अजित पवारांनी शरद पवारांचं ऐकलं असतं तर आज चित्र नक्कीच वेगळं असतं. पण स्वत:च्या दिवट्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांनाही अव्हेरलं, अशी सडकून टीका शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

गेल्या 10 ते 12 वर्षात राष्ट्रवादीचं वाटोळं व्हायला अजित पवारच जबाबदार आहेत. पक्षांतर्गत एक गट तयार करून पवार साहेबांच्या इच्छेविरूद्ध त्यांनी मुख्यमंत्री व्हायचा देखील प्रयत्न केला होता, असा हल्लाबोल त्यांनी केला. अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी शिरूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रवादीवर त्यांनी सडकून टीका केली.

अजित पवार हे घरभेदी असून त्यांची मस्ती त्यांच्याच नेत्यांनी जिरवली. मला मस्ती चढली किंवा माझी मस्ती उतरली हे बोलताना अजित पवारांनी 10 वेळा विचार करावा, असंही ते म्हणाले.

अजित पवारांची मस्ती जिरवायला मी अजून खंबीर आहे. शिरूरमध्ये माझ्याविरोधात लढण्याची आणि औलाद सांगण्यापर्यंतची भाषा त्यांनीच वापरली होती. त्यांच्यात जर हिम्मत होती तर मग का नाही माझ्याविरोधात उभे राहिले? असा सवालही त्यांनी अजित पवारांना केला.

मस्ती माझी नाही तर तुमची जिरलीय… मुलाचा पराभव झाल्याने तोंड कुणाचं काळवंडलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय, असा पलटवार त्यांनी अजित पवारांवर केला.

दरम्यान, घाबरून घरी बसणाऱ्यापैंकी मी नाही. अजित पवार यांना माझे आव्हान होते… आहे… आणि राहिल… मी कुणाला घाबरत नाही हे सांगणे म्हणजे अहंकार किंवा दर्पोक्ती नाही, असंही आढळराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-भाषणादरम्यान शेतकरी ओरडला गावात दवाखाना नाही; लगोलग आदित्य ठाकरे म्हणाले…

पक्षांतराच्या काळात राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो; माझे तत्व एकच ‘पवार एके पवार…’

विश्वविजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार नाराज; म्हणतो…

-राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार???; अजित पवार म्हणतात…

-महेंद्रसिंग धोनीबद्दल सर्वात मोठी बातमी! वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही पण…

IMPIMP