लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर!, अदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती

Aditi Tatkare | जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यावेळी लाभार्थ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी असणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

लाभार्थ्यांच्या संख्येत घट-

“सरकार कोणाचेही पैसे माघारी घेणार नाही, तसा सरकारचा कोणताही विचार नाही,” असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले. सध्या या योजनेसाठी कोणतेही नवीन निकष नाहीत, असेही त्यांनी (Aditi Tatkare) स्पष्ट केले. असे असले तरी, लाभार्थ्यांची संख्या कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिला आणि मुलींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

जानेवारीच्या हप्त्याबाबतची माहिती-

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा हप्ता जमा होणार आहे. या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर केली जाईल. लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात 2100 रुपयांप्रमाणे पैसे येतील, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्ही विधानसभा निवडणुकीत महिलांना दिलेले (Ladki Bahin Yojana) आश्वासन लवकरच पूर्ण करू. या योजनेमुळेच महिलांनी महायुतीला भरघोस यश मिळवून दिले आहे.” त्यामुळे लवकरच महिलांच्या बँक खात्यात दरमहा 2100 रुपये जमा होतील, असे त्या म्हणाल्या.

याबाबत बोलताना मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare)यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आगामी अर्थसंकल्पात आणि त्यानंतरच्या काळात याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

News Title : Aditi Tatkare on ladki bahin yojana

महत्त्वाच्या बातम्या-

बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय?, आणखी एक खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर!

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच एवढे रुपये जमा होणार! आदिती तटकरेंचा मोठा खुलासा

खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

सैफ अली खानच नव्हे तर शाहरुख खानच्या घराची… पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट!

क्रिकेटपटू, उद्योगपती, अभिनेता…‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरनं खळबळ!