Top news महाराष्ट्र मुंबई

…म्हणून 48 तासांसाठी रायगड जिल्ह्यात संचारबंदी, पालकमंत्री आदिती तटकरेंची घोषणा

रायगड | प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनांनुसार निसर्ग वादळ अरबी समुद्रातून वेगाने पुढे येत असल्याने कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. याच याच पार्श्वभूमीवर  रायगड जिल्ह्यात खबरदारी म्हणून दि. 3 जून पहाटे 2 वाजेपासून ते पुढील 48 तास कलम 144 अंतर्गत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, असं पालकमंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

संचारबंदीदरम्यान नागरिकांनी आपल्या घरातच सुक्षित रहावे. शासनातर्फे वेळोवेळी सूचना मिळतील, तोवर सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन देखील त्यांनी रायगड जिल्हावासियांना केलं आहे.

मच्छिमार बांधवांनीदेखील समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. समुद्र किनारपट्टीवरील व कच्च्या घरात स्थायिक असलेल्या नागरिकांनी गावात सुरक्षितस्थळी आपल्या परिवारासह गुरा-ढोरांनाही सोबत घेऊन जावे, त्यांना एकटे सोडू नये. गावातील नागरिकांनीसुध्दा त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याचं तटकरे म्हणाल्या.

जिल्हा प्रशासनास योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. करोनासोबत दोन हात करीत असतानाच हे वादळाचे संकट उभे राहिले आहे. यालाही आपण संयम आणि धैर्याने सामोरे जाऊ. शासन आणि प्रशासन जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा त्यांनी जिल्हावासियांना दिला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-‘इंडिया’ नको ‘भारत’ नावानेच देशाची ओळख व्हावी; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

-ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो का ट्रेंड होतंय?, जाणून घ्या कारण

-रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्र्यांचा दावा

-कोरोनाविरोधी लढ्यात केरळची महाराष्ट्राला मोलाची मदत, मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

-कोरोनाच्या संकटकाळात 30 हजार दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल