…तर व्होडाफोन कंपनी बंद करावी लागेल; आदित्य बिर्ला यांचा सरकारला इशारा

मुंबई |  सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर व्होडाफोन आयडीयाला 53 हजार कोटींची रक्कम सरकारकडे भरावी लागणार आहे, मात्र यामध्ये केंद्र सरकारने व्होडाफोन आयडीया कंपनीला दिलासा दिला नाही तर मात्र कंपनीला नाईलाजाने व्यवसाय आवरता घ्यावा लागेल, असा इशाराच आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि व्होडाफोन आयडियाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांच्या वक्तव्याचे पडसाद शेअर बाजारात देखील उमटलेले दिसले. शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मात्र बिर्लांच्या या इशाऱ्याने वोडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे.

गेल्या वर्षी आयडियाचे वोडाफोनमध्ये विलिनीकरन करण्यात आले होते. मात्र दूरसंचार आणि स्पेक्ट्रम शुल्कापोटी वोडाफोन आयडियाला 53 हजार 38 कोटी सरकारला भरावे लागणार आहे.

दरम्यान, नुकताच वोडाफोनला 1. 17 लाख कोटींचा विक्रमी तोटा झालाय. या प्रकरणी सरकारने दखल घेतली नाही तर कंपनीला नाईलाजाने व्यवसाय आवरता घ्यावा लागेल, असं बिर्ला यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-