आदित्य ठाकरेंमध्ये शिवाजी महाराजांची झलक पाहणारा विद्यार्थी नव्हे तर शिवसैनिक!

अहमदनगर | युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदित्य संवाद या कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरेंमध्ये शिवाजी महाराजांची झलक दिसत असल्याचं एका मुलाने म्हटलं होतं. मात्र तो विद्यार्थी नसून शिवसैनिक होता हे समोर आलं आहे. 

आदित्य संवाद या कार्यक्रमात शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी बसवले जातात. मात्र प्रश्न विचारणारे विद्यार्थी नसून शिवसैनिक असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

नरेंद्र मोदींच्या इव्हेंटमधील अनेक घटनांना वास्तवात घडल्यासारखं दाखवण्यात आलं होतं. मोदींच्या परदेशात झालेल्या इव्हेंटमध्ये त्यांना प्रश्न विचारणारे अनेक लोक भाजपचे पदाधिकारी असल्याचं समोर आलं होतं. 

आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत देखील तोच प्रकार समोर आला आहे. ‘आदित्य संवाद’ या नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात शाळा कॉलेजचे विद्यार्थी बसले होते. कार्यक्रमात बसलेल्या प्रत्येकाच्या नावाच्या चिठ्ठ्या एकत्र करण्यात आल्या होत्या.

विद्यार्थ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्यांपैकी आदित्य ठाकरेंनी ऋषिकेश काकडे या मुलाच्या नावाची चिठ्ठी उचलली. मात्र तो शाळा किंवा कॉलेजचा विद्यार्थी नसून शिवसैनिकच असल्याचं निष्पन्न झालं आहे. 

आदित्य ठाकरेंमध्ये शिवाजी महाराजांची झलक पाहणारा हा मुलगा नगरचाच असून त्याच्या फेसबुकवर ‘माझं मत शिवसेनाला’ अशी पोस्ट आहे. 



महत्वाच्या बातम्या-

-अण्णा हजारेंचा इशारा; मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार!

-चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग

-खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी टाकणार!

-कार्यकर्त्याला भाषणादरम्यान अश्रू अनावर ; धनंजय मुंडेंनी दिला धीर

-…म्हणून लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल