मंत्री आदित्य ठाकरेंकडून पर्यावरण खात्यासंबंधी मोठा बदल!

मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता ‘पर्यावरण व वातावरणीय बदल’ विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा बदल करण्यात येईल. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल, अशी घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केली.

विभागातील नावाच्या बदलासह विभागाचे ध्येय व उद्दिष्टे अधिक व्यापक करत त्यात सध्याच्या वातावरणातील बदल व त्या अनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी दिली.

युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट प्रोग्रामने (UNEP) “जागतिक पर्यावरण दिन २०२०” ची संकल्पना “Time For Nature” अशी निश्चित केली असून त्या अनुषंगाने विभागाने राज्य शासनाच्या इतर संबंधित विभागांसह वातावरणीय बदलांबाबत उपाययोजना करत निसर्गपूरक जीवनपध्दतीसाठी कृती आराखडे तयार केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाची निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी यावर्षी या विभागामार्फत 100 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मंत्री श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी जाहीर केले.

महत्वाच्या बातम्या-

-महसूलमंत्री थोरात यांचा राज्यातल्या जनतेला करासंबंधी मोठा दिलासा

-येत्या ४८ तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

-छत्रपतींनी घालून दिलेला आदर्श सदैव प्रेरणा देत राहिल- अजित पवार

-“लॉकडाऊनबाबत नियोजन नव्हतं, त्याचेच परिणाम आज देश भोगत आहे”

-…म्हणून देशाने राहुल गांधी यांचे आभार मानायलाच हवेत; शिवसेनेचं ‘रोखठोक’ मत