मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. इतकंच नाही तर त्यांचा मतदारसंघही ठरला आहे. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढणारे आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढतील. लोकांमधून निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य ठरतील.
वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे हेच उमेदवार असतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर यांनी कार्यकर्ता मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांना आता तरी वरळी विधानसभेचा पेपर फोडा, असं आवाहन केलं.
युतीचे चित्र स्पष्ट न झाल्याने सध्या पेपर तपासणी सुरु आहे. नंतरच खरे पेपर फुटतील, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
22 उमेदवारांच्या जातीसह वंचितची पहिली यादी जाहीर- https://t.co/GfCEu8SV6S #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019
बापाकडे बघून मुलाला कोणी मुलगी देत नाही; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना टोला- https://t.co/kYRvqggpp6 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019
“लोकसभेत तोंडावर आपटलात त्यामुळे आता विधानसभेत झाकली मुठ ठेवा”- https://t.co/7HYsUuaAnO #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019