नाशिक महाराष्ट्र

“दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय अन् विधानसभेवर भगवा फडकवायचाय”

नाशिक |  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरू आहेत. याच निमित्ताने ते महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. काल नाशिकमध्ये त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

ही यात्रा कुठल्याही पदासाठी नाही. या यात्रेच्या माध्यमातून मला राज्य सरकारमधील कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मला महाराष्ट्र दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदुषणमुक्त घडवायचाय अन् विधानसभेवर भगवा फडकवायचाय, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसैनिक हा निवडणुकीपुरताच नव्हे तर निवडणुकीनंतरही लोकांच्या सेवेसाठी झटत असतो. शिवसेनाप्रमुखांच्या सांगण्यावरून आपण 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिकवण  पाळूया. आणि याच शिकवणीनुसार शिवसेना आणि शिवसैनिक पुढेही काम करीन, असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला.

जनतेचे न्याय हक्क मिळवून देणारे सरकार स्थापण्यासाठी ही यात्रा आहे, असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं. मला महाराष्ट्र हिरवागार आणि सुजलाम सुफलाम घडवायचाय. त्यासाठी मला तुमची साथ द्या, असं आवाहन आदित्य यांनी उपस्थितांना केलं.

आदित्य यांच्या यात्रेला गावोगावी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे चित्र नक्कीच आशादायी आहे. आदित्य यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकतात, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, सत्ता आल्यास मुख्यमंत्री कुणाचा?? यावरून शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये सध्या तूतू-मैंमैं सुरू आहे. दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होणार अशी वक्तव्य करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-दुष्काळ, नापिकीला कंटाळून गावच काढलं विकायला; मायबाप सरकारनं लक्ष देण्याची गरज

-भाजप आज विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार; शिवसेनेला डिवचण्याचे प्रयत्न??

-मतदारांची माहिती आधारला लिंक करा; फडणवीसांची निवडणूक आयोगाकडे मागणी

-“सरकारवर टीका करायची आणि पुन्हा एकत्र बसायचं ही शिवसेनेची नाटकबाजी”

-बाळासाहेब ठाकरेंची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी व्हावी; शिवसेनेची मागणी

IMPIMP