भाषणादरम्यान शेतकरी ओरडला गावात दवाखाना नाही; लगोलग आदित्य ठाकरे म्हणाले…

नाशिक | ज्यांनी मत दिली त्यांचे आभार मानायचे आहेत… ज्यांनी नाही दिली त्यांची मनं जिंकायची आहेत, असा मानस ठेऊन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. जळगाव, धुळेनंतर ही यात्रा आज नाशिकमध्ये होती.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आदित्य ठाकरे उपस्थितांना संबोधित करत होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मतं 3 टक्क्यांनी वाढली आहेत. दिलेली वचनं पाळायला आणि 80 टक्के समाजकारण करून 20 टक्के राजकारण करायला आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. एवढ्यात भाषणादरम्यान खालून एका शेतकऱ्याने आवाज दिला.

आमच्या गावात आरोग्य केंद्र नाहीये. त्यावर भाषण चालू असतानाच आदित्य यांनी त्या शेतकऱ्याला गावात 8 दिवसात दवाखाना सुरू करतो, असं म्हटलं. यानंतर आपले मुद्दे पूर्ण करत आदित्य यांनी आपलं भाषण संपवलं.

आदित्य यांच्याबरोबर आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. खरंच 8 दिवसांत त्या गावात दवाखाना सुरू होणार का? आणि आदित्य ठाकरे दिलेलं आश्वासन पाळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळालं. पण आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. लोकसभेनंतर राज्यातली राजकीय गणितं बदललेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा म्हणावा तसा प्रभाव राज्यात सध्या तरी दिसत नाहीये. याचाच फायदा शिवसेना घेऊ इच्छिते आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा असल्याची चर्चा आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पक्षांतराच्या काळात राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो; माझे तत्व एकच ‘पवार एके पवार…’

विश्वविजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार नाराज; म्हणतो…

-राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार???; अजित पवार म्हणतात…

-महेंद्रसिंग धोनीबद्दल सर्वात मोठी बातमी! वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही पण…

क्रिकेटपटूंच्या बायका आणि प्रेयसींचा खर्च किती?; ‘सीओए’नं तपशील मागवल्याने खळबळ