महाराष्ट्र मुंबई

मी येतोय… सगळ्यांचे आभार मानायला आणि मनं जिंकायला- आदित्य ठाकरे

मुंबई |  लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपलाये. निकाल लागलेत. लोकसभेला भाजप-शिवसेनेच्या पारड्यात लोकांनी मतरूपी आशीर्वाद  टाकले. याच्यातूनच उतराई होण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळयासमोर ठेऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ चा नारा देत राज्यात सर्वसामान्यांशी संवाद साधण्याकरिता ‘जनसंवाद’ यात्रेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेचीदेखील राज्यात उद्यापासून ‘जनआशीर्वाद’ यात्रा चालू होत आहे.

ज्यांनी मत दिली त्यांचे आभार मानायचे आहेत… ज्यांनी नाही दिली त्यांची मनं जिंकायची आहेत, असा मानस ठेऊन ही यात्रा काढण्याचं शिवसेनेने ठरवलंय. आज शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून या यात्रेची माहिती देण्यात आली आहे.

उद्या(गुरूवार) जळगाव येथून या यात्रेचा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शुभारंभ करणार आहेत. मी येतोय…. अशी टॅगलाईन शिवसेनेने दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळालं. पण आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. लोकसभेनंतर राज्यातली राजकीय गणितं बदललेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा म्हणावा तसा प्रभाव राज्यात सध्या तरी दिसत नाहीये. याचाच फायदा शिवसेना भाजप घेऊ इच्छितात आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून भाजप शिवसेनेची जनयात्रा असल्याची चर्चा आहेत.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाला तरूणांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. त्याचं मतात देखील रूपांतर झालं. आता आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकांत देखील हा करिश्मा पुन्हा साधणार का? आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकावण्याच्या कार्यात आपलं किती योगदान देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेनेला मोर्चाच काढायचा होता तर ‘वर्षा’ बंगल्यावर का नाही काढला??- निलेश राणे

-धोनीच्या सेमीफानलच्या खेळीवरून युवराजच्या वडिलांचा अतिशय गंभीर आरोप!

-शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर संग्राम जगताप यांचा मोठा खुलासा

-काँग्रेस सरकारने जशी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तशी तुम्हीही द्या; अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी

-देशाच्या इंचनइंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू- अमित शहा

IMPIMP