सिंधुदुर्ग | आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या शिवसंवाद यात्रेनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते सध्या सिंधुदुर्ग (Sindhudurg)जिल्ह्यात मुक्कामी आहेत. तेथे त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदार, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि नव्या मंत्रीमंडळावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रात दोन मंत्र्यांचे जम्बो मंत्रीमंडळ आहे, असे त्यांनी यावेळी भाषणात म्हटले.
शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विकास रखडला आहे. या सर्वाकडे दुर्लक्ष करुन केवळ विरोधकांना दाबण्यासाठी शिंदे आणि भाजप सरकार काम करत आहे. पक्ष फोडा, गद्दारी करा आणि ज्यांनी राजकीय ओळख दिली त्यांच्या पाठीत सुरा खुपसा हे प्रकार चालले आहेत, असे यावेेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामे द्या, असे आव्हान ठाकरेंनी बंडखोरांना केले आहे. तसेच चाळीसच्या चाळीस जागांवर निवडणुका घ्या आणि पाहुया, सत्ता जिंकते की सत्य? असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ज्यांना अजूनही आपण शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray) धोका दिला असे वाटत आहे, त्यांना उद्धव ठाकरे यांना धोका द्यायचा नाही असे वाटत असेल तर परत या, अशी साद देखील आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना घातली आहे.
आम्ही बंडखोर आमदारांना सर्व काही दिले, प्रेम दिले, सन्मान दिला, जनतेने त्यांना मते दिली, डोक्यावर घेतले पण त्यांनी दगा दिला. वार करायचा तर छातीत करायचा, पाठीत का केला? त्यांनी असे का केले? याचे मला अद्याप कोडे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कुडाळ (Kudal) येथे ते शिवसंवाद यात्रेत बोलत होते. कोकण आणि शिवसेनेचे नाते अतूट आहे. कोकणाने नेहमी शिवसेनेला आणि ठाकरे कुटुंबाला साथ दिली. तसेच आम्ही कोकणासाठी विकासकामे करत होतो. कोकणाला न्याय मिळाला होता. तेव्हा कोकणातील लोक गद्दारांना क्षमा करणार नाहीत, असे देखील यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
फक्त पत्राचाळच नाही तर ‘या’ घोटाळ्यातही संजय राऊतांचं नाव, ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
‘लवकरच भाजपचे बुरे दिन येणार’, राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे आक्रमक
‘संजय राऊतांनंतर आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा नंबर’, रवी राणांच्या दाव्यामुळे खळबळ
शिवसेनेबाबत जे पी नड्डांचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी! संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया