पर्यटन खात्याला अजित पवारांनी दिला भरघोस निधी; त्यावर आदित्य ठाकरे म्हणतात…

मुंबई |  इतिहासात पहिल्यांदाच पर्यटन खात्याला 1 हजार कोटींहून अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. यावेळी अजित पवारांनी ही घोषणा केली आहे.

अजित पवारांकडून खास गिफ्ट मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी खास ट्वीट करत अजितदादांचे आभार मानले आहेत.पर्यटनामुळे निर्माण होणारे रोजगार आणि महसूल लक्षात घेऊन पर्यटन विभागाला दिलेल्या निधीत ऐतिहासिक वाढ केल्याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. एवढी वाढ यापूर्वी कधीच झाली नव्हती, असं आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

हा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक घटकासाठी, प्रशासनाच्या सर्व क्षेत्रांसाठीचा अर्थसंकल्प आहे. व्यवहारिक आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या अर्थसंकल्पाबद्दल अभिनंदन करतो, असं आदित्य म्हणाले आहेत.

दुसरीकडे वरळीत पर्यटन संकुल उभारण्यात येणार आहे. तसंच वन विभागासाठी 1630 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त पर्यावरण विभागासाठी 230 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यटन स्थळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी विधीमंडळात दिली आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-अजित पवारांच्या अर्थसंकल्पात ही महत्त्वाची घोषणा; मनसेकडून जोरदार स्वागत

-ज्यासाठी अर्थसंकल्प मांडतात तेच नव्हतं; अजित पवारांनी मांडलेल्या बजेटवर फडणवीसांची टीका

-…तर मला आनंद झाला असता; अर्थसंकल्पावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

-मराठा समाजासाठी अजित पवारांची मोठी घोषणा!

-पुण्याचा ट्राफिक प्रश्न सोडवण्यासाठी गडकरी अन् अजित पवारांची युती…!