राज ठाकरेंकडून काय धडा घेतला??? आदित्य ठाकरे म्हणतात…

अहमदनगर |  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद दौऱ्याला जळगावमधून सुरूवात झाली आहे. मजल-दरमजल करत आज ही यात्रा नगरमध्ये पोहचली. नगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आदित्य ठाकरे यांच्यात संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना काहीसा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. मात्र आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

राज ठाकरेंकडून तुम्ही राजकारणातला कोणता धडा घेतलाय? किंवा घेण्याचा प्रयत्न करताय?? यावर मी राजकारणाचे धडे लोकांकडून घेत असतो. किंवा तसा प्रयत्न करतो. मी पहिला धडा घेतलाय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून…. ते मला नेहमी सांगायचे जे काही करणार असशील ते 100 वेळा विचार करून कर… एकदा बाण सुटला की परत येत नाही…. असं उत्तर देताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज केला.

पुढे बोलताना आदित्य म्हणाले, दुसरा धडा मी माझे वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतलाय.. जे काही करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं… कधी नाटकं करायचं नाही आणि लोकांशी कधी खोटं बोलायचं नाही… या दोन गोष्टी घेऊन मी पुढं चाललो आहे.

बाकी लोकांचे आशीर्वाद आणि लोकांकडून शिकायचं असतं आणि तसं पाहायला गेलं तर राजकारण ही काही शिकायची गोष्ट नसते. राजकारणात फक्त धडे घेऊन चालत नाही. तुम्हाला त्याचं गांभीर्य असणे गरजेचे असते. आवडीने केलं तर तुम्हाला कुठलेही धडे घेण्याची गरज नाहीये, असंही ते म्हणाले.

दरम्यान, याच कार्यक्रमात एका विद्यार्थीनीने महाविद्यालयातील कचऱ्याचा प्रश्न आदित्य यांच्यापुढे उपस्थित केला. त्यावर पर्यावरण मंत्री माझ्यासोबत आहेत. पुढच्या काही तासात हा विषय मी मार्गी लावतो, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या बातम्या-

-…अन् खासदार नवनीत राणांनी आपला पहिला पगार मुख्यमंत्र्यांना दिला!

-काँग्रेस म्हणजे जातीयता, घराणेशाही आणि भ्रष्टाचार- चंद्रकांत पाटील

पुढचा मुख्यमंत्री कोण हे मला काय विचारता?- राज ठाकरे

अजित पवारांच्या वाढदिवशी बारामतीत ‘मुर्दाबाद’च्या घोषणा! पाहा व्हीडिओ-

-उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय पण पंतप्रधान झालेलं पाहायचंय- तानाजी सावंत