शिवसेनेने विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला अन् शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले- आदित्य ठाकरे

नाशिक |  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरू आहेत. याच निमित्ताने ते महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. नाशिकमध्ये त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

शिवसेनेने विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. शिवसेनेच्या मोर्च्याने नेमकं काय साध्य झालं? हे सांगत असताना त्यांनी हा दावा केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणून विमा कंपन्यांवर धडक मोर्चा काढला होता. या मोर्च्यात शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते.

विमा कंपन्यांनी योग्य पद्धतीने नियमांची अंमलबजावणी करावी, वेळच्यावेळेला शेतकऱ्यांना विमा द्यावा, त्यांना नाडू नये, यासाठी शिवसेनेने मोर्चा काढला होता. मात्र शिवसेनेच्या मोर्च्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती.

दरम्यान, जनआशीर्वाद यात्रा ही यात्रा कुठल्याही पदासाठी नाही. या यात्रेच्या माध्यमातून मला राज्य सरकारमधील कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मला महाराष्ट्र दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदुषणमुक्त घडवायचाय अन् विधानसभेवर भगवा फडकवायचाय, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेकडे बोलायची खुमखुमी असणारे नेते जास्त आहेत; मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांचा निशाणा

-मी अशा ठिकाणी जन्मलोय जिथली भाषा तुम्हाला कळत नाही- रावसाहेब दानवे

-‘मिशन वेस्ट इंडिज’! ‘या’ 15 जणांची भारतीय संघासाठी निवड

-…तर काँग्रेस राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत 10-10 जागा मिळतील- चंद्रकांत पाटील

…अन् जे. पी. नड्डांच्या सुरात चंद्रकांत पाटलांनी सूर मिसळला