सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे होते टार्गेटवर, स्टडी रिपोर्टचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकारणानं संपूर्ण देश हा.दरला होता.  सुशांत प्रकरणातील गुंता सोडवण्यासाठी देशातील सीबीआय, ईडी आणि एनसीबी सारख्या तीन उच्च दर्जाच्या एजन्सी शोध घेत होत्या. तरीही सुशांत प्रकरणातील गुंता वाढतंच चालला होता. मात्र, आता कित्येक महिन्यांच्या शोधानंतर अखेर सीबीआयनं सुशांतने आ.त्मह.त्याच केली होती, असं स्पष्ट केलं आहे. या दरम्यान आता सुशांत प्रकरणी एक नवा स्टडी रिपोर्ट समोर आला आहे.

मिशिगन विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकाच्या नेतृत्वात काही संशोधकांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. या स्टडी रिपोर्टमध्ये काही पत्रकार, नेते आणि मीडिया हाऊसेसनं स्वतःच्या फायद्यासाठी सुशांत सिंह राजपूत म.र्डर थिअरी वापरली, असं सांगितलं आहे. या रिपोर्टनुसार सुशांतच्या मृ.त्यूनंतर त्याच्या ह.त्येच्या थेअरिस प्रोत्साहन देणाऱ्या कंटेंटला जास्त ट्रॅक्शन मिळालं आहे.

मिशिगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हा स्टडी रिपोर्ट तयार करताना सुमारे 7 हजार यु ट्यूब व्हिडीओ आणि 10 हजार ट्विटचे विश्लेषण केलं आहे. हे विश्लेषण सुमारे 2 हजार पत्रकार आणि मीडिया हाऊसेस तसेच 1200 राजकारण्यांशी जोडलं गेलं आहे.

या रिपोर्टनुसार सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुरुवातीच्या टप्प्यात राजकारण्यांनी सुशांतची ह.त्या नसून आ.त्मह.त्या आहे, असं सांगितलं. यानंतर माध्यमांनी राजकारण्यांचं हेच म्हणणं पुढे लावून धरलं. यावेळी आदीत्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, दिशा सॅलीयन आणि सलमान खान यांना सर्वात जास्त टार्गेट करण्यात आलं होतं.

जुलै महिन्यात राजकीय नेत्यांनी सुशांतच्या आ त्मह.त्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. सामाजिक माध्यमांवरूनही पूढे हाच मुद्दा जोर धरू लागला. यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पत्रकारांनीही महाराष्ट्र सरकार विरोधी प्रचार पूर्ण ताकदीनं चालू ठेवला.

सुशांतची आ.त्मह.त्या नसून ह.त्त्याच आहे, हे बिंबवण्यात भाजपशी संबंधित असलेल्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. भाजपशी संबंधित अकाऊंटस ‘म.र्डर’ शब्दाचा वापर करण्यात अधिक आ,क्रमक होती, असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

सुशांत प्रकरणातील स्टडी रिपोर्ट तयार करणाऱ्या मिशिगन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जयजीत पॉल यांनी सुशांत प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. सुशांत प्रकारणानंतर संपूर्ण सोशल मीडिया स्पेस इतक्या प्रभावीपणे सज्ज केली गेली की संपूर्ण देश भावनिक पैलू असलेल्या गोष्टींवर सहजप्रकारे एकवटू शकेल, असं जयजीत पॉल यांनी म्हटलं आहे.

तसेच या काळात वास्तविक जिवनातील कथांच्या आधारे काही स्वारस्य गटांनी ऑनलाइन नेरीटीव्हवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे, असंही पॉल यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत सिंह राजपूतनं आ त्मह.त्याच केली हे कशावरून? एम्सच्या टीमनं दिलं स्पष्टीकरण

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणाऱ्या पायलचा ‘त्या’ वक्तव्यावरून यूटर्न, माफी मागायलाही तयार

नेहा कक्करच्या लग्नाची वार्ता ऐकताच नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली म्हणाला…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाचा निर्णय

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! ‘या’ बड्या दिग्दर्शकाचं नि.धन