दरवाजे अद्यापही खुले आहेत, पण… आदित्य ठाकरेंची बंडखोरांना अट

मुंबई | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. विधानसभेबाहेर विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी असा सामना रंगला होता. आदित्य ठाकरे (Aditya Thacekeray) यांंनी यावेळी माध्यमांसोबत संवाद साधला.

जे गद्दार आम्हाला सोडून गेले त्यांचा गेम कसा झाला, हे सर्वांनी पाहिले आहे. महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण आहे, हे आता सर्वांना माहित आहे. अपक्ष आणि महिलांच्या तोंडाला भाजपने पाने पुसली, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबईकरांना देखील नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, असे ठाकरे म्हणाले. तसेच बिहारमध्ये जे नितीश कुमारांना (Nitish Kumar) जमले ते ठाकरेंनी का केले नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.

त्यावर ठाकरे म्हणाले, आम्ही 2019 साली तसा प्रयत्न केला होता. आणि महाविकास आघाडीची (MVA) निर्मीती करुन देशाला नवा पर्याय दिला होता. पण आमच्यातील काही गद्दारांनी विश्वासघात केला, असे ठाकरे म्हणाले.

आता त्यांना तिकडे मंत्रिपदे मिळाली नाहीत. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांची तिकडे घुसमट होते आहे. आमचे दरवाजे त्यांच्यासाठी अजून देखील उघडे आहेत. ते परत येऊ शकतात, असे ठाकरे म्हणाले.

पण जर त्यांना यायचे नसेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन निवडून यावे, असे आव्हान ठाकरे यांनी केले.

यावेळी विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीत देखील ठाकरे सहभागी होते. त्यांनी हे गद्दारांचे सरकार आहे, असे म्हंटले आहे आणि हे गद्दारांचे सरकार कोसळणार असेही ते म्हणाले. ठाकरे आजच्या अधिवेशनाला गैरहजर आहेत. ते मुंबईत शिवसंवाद यात्रा घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

रेवडी प्रकरण: आश्वासने देणे धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

विनायक मेटे अपघात प्रकरण: मेटेंच्या ड्रायवरचा मोठा खुलासा

‘दोन बायका अन् अनुराग कश्यपचे ऐका’

उद्यनराजेंनी तोंडाने भरवला पेढा…

‘आले रे आले, गद्दार आले’, ‘पन्नास खोके, एकदम ओके’