आदित्य ठाकरे म्हणतात, “नितेश राणेंवर काय बोलायचं? आमची पातळी…”

मुंबई | आगामी महापालिका निवडणुकीवर आता राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे दिग्गज नेते आता मैदानात उतरून काम करत असल्याचं चित्र आहे.

अशातच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल औरंगाबादचा दौरा केला. आदित्य ठाकरे सिल्लाड तालुक्यात आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

शिवसैनिक सकाळपासून फुलांच्या माळा घेऊन उभे होते. आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं सर्रास उल्लंघन झाल्याचं पहायला मिळालं होतं.

यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी चुक झाल्याची कबुली दिली. त्यावेळी मिश्किळ टिप्पणी करत गर्दी बघून मुख्यमंत्री मला रागावतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

मला मुख्यमंत्री बोलले तर मी सरळ शिवेसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्यावर ढकलून देईन, अशं मिश्किल टोमणा आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.

कोरोना संकटानंतर दीड वर्षांनी अशी गर्दी बघायला मिळतेय, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तर नितेश राणे यांचा जामीन रद्द झाला होता, त्यावर देखील आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचं दिसून आलं. नितेश राणेंवर काय बोलायचं? आम्ही आमची राजकारणाची पातळी खाली घेऊन जाणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आम्ही आमचं काम करु, कामावर लक्ष देऊ आणि जनतेची सेवा करु, असंही ते यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी वेरुळ लेणीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी मला मंत्री म्हणून पाहण्याचं स्वभाग्य मिळालं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“ब्रा आणि भगवान”, वादग्रस्त वक्तव्यावरून श्वेता तिवारीच्या अडचणी वाढल्या

पुरुषांच्या ‘या’ सवयीमुळे होतोय स्पर्मवर परिणाम, लगेचच सवय सोडून द्या

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

कडाक्याच्या थंडीमुळे उद्भवतात समस्या; अशी लक्षणं दिसताच घ्या डाॅक्टरांचा सल्ला

Omicron किती वेळ जिवंत राहू शकतो?, अभ्यासातून सर्वात मोठा खुलासा झाला