Top news महाराष्ट्र मुंबई

अगोदर लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं, राजकारणाला भरपूर वेळ पडलाय- आदित्य ठाकरे

मुंबई |   देशात जर कुठे काही चुकीचं होत असेल तर आम्ही त्यावर काही बोलत नाही. कारण या काळामध्ये पक्षीय राजकारण विसरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असते. लोकांची सेवा करणं गरजेचं असतं. मला वाटतं अगोदर लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं, राजकारणाला भरपूर वेळ पडलाय, अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

देशात महाराष्ट्रच असं एक राज्य आहे जिथे विरोधी पक्ष अशा भावनेने काम करतोय जिथे महाराष्ट्र जर खाली गेला, जगाच्या मीडियात खाली दिसला तर त्यांना बरं वाटतं, असा निशाणा देखील आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर साधला.

विरोधी पक्षाच्या हातात सत्ता हातात नसल्याने त्यांना अपचन होत आहे आणि याला डायजीन किंवा जेल्युसिल हेच चालू शकतं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. बीबीसी मराठीशी बातचित करताना त्यांनी कोरोनासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

साथीच्या आजारादरम्यान आपल्याला आकड्याला घाबरून चालणार नाही. या आकड्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. जेव्हा एखादी साथ असते तेव्हा तुम्ही आकडे किती ओळखता, त्या रुग्णांना शोधून त्यांना आयसोलेट करता, यात सरकारचं यश असतं, असा प्रमुख मुद्दा त्यांनी यावेळी मांडला.

महत्वाच्या बातम्या-

-केंद्राकडून राज्याला कोरोनाविरुद्ध उपाययोजनेसाठी एकही पैसा मिळाला नाही- वडेट्टीवार

-फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतल्या आकडेवारीवर पृथ्वीराज चव्हाणांचं चॅलेंज, म्हणाले…

-संकटात राजकारण करणाऱ्या विरोधकांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही- बच्चू कडू

-नरेंद्र मोदींकडून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना अभिवादन, म्हणाले…

-या भारतीय अॅपचा टिकटॉकला जबर दणका; टॉप चार्टमध्ये टिकटॉकला मागे टाकत दुसऱ्या नंबरवर