‘घोटाळे तुम्ही करायचे, लफडी तुम्ही करायची पण जेव्हा…’, खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे संतापले

मुंबई | एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार फुटले आणि शिवसेनेला पडलेलं भगदाड दिवसेंदिवस मोठं होत चालल्याचं पाहायला मिळत आहे.

आमदारांपाठोपाठ आजी-माजी नगरसेवक व जिल्हाध्यक्षांनी देखील शिवसेनेकडे पाठ फिरवत शिंदे गट जवळ केला. त्यात आता खासदारांचा मोठा गट देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याने शिवसेनेला आणखी एक धक्का बसला.

आता जेमतेम खासदार आमदार व काही निष्ठावान कार्यकर्ते शिवसेनेकडे शिल्लक असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहे. शिवसेनेचे खासदारही फुटल्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीकेचे बाण सोडले आहेत.

ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्या फाईल्स उघडल्यानेच त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, असा घणाघाती आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

घोटाळे तुम्ही करायचे, लफडी तुम्ही करायची आणि जेव्हा प्रकरण अंगाशी येत असेल तेव्हा पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा, अशी बोचरी टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, तुम्ही गुवाहाटी आणि सुरतला जाऊन मज्जा करता. आणि याला बंड म्हणता?, असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्रातील सरकार स्थापनेसाठी सरकार दिल्लीच्या तख्तासमोर झुकलं, असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-

सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 1 ऑगस्टला, राजकीय पेच कायम

‘बाळासाहेबांनाही आम्हीच पक्षात आणलं असंही ते म्हणतील’, संजय राऊत आक्रमक

शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार?, आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी

संजय राऊत हाजीर हो! राऊतांना ईडीचा तिसऱ्यांदा दणका

“पूर्वीचे सुलतान मंदीरं पाडायचे आणि आताचे सुलतान शिवसेना पाडत आहेत”