‘कपड्यांचे रंग बदलले म्हणून…’; आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना टोला

मुंबई | मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून राज ठाकरे आक्रमक झाले आहे. पण, अंगावरचे कपडे बदलून हिंदुत्व येत नाही, त्यासाठी हिंदुत्त्व हे रक्तात असावं लागतं, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackery) यांनी टोला लगावला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या अंगावर भगवी शाल टाकण्यात आली होती.

कपड्यांचे रंग बदलून कधीही हिंदुत्तव येत नाही. हिंदुत्व हे रक्तात असावं लागतं, आमच्या मनात आणि रक्तात हिंदुत्व आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

खासदार संजय राऊत यांच्यासोबत चर्चा झाली आहे. दौऱ्यावर कधी जायचे आहे. याचा लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, मे महिन्यात अयोध्याला जाण्याचा विचार आहे. पण नेमकी तारीख काय असणार आहे, हे लवकरच सांगितलं जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार आहे. आणि 5 जूनच्या दिवशी अयोध्येला जाणार आहे. 5 तारखेला सहकाऱ्यांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज यांनी केली.

आमची सर्व तयारी सुरू आहे आम्हाला शांतता भंग करायची नाही आहे.  प्रार्थनेला विरोध नाही पण जर त्यांना loud स्पीकर वर ऐकवायचं असेल तर आम्ही ही आरत्या भोंग्यावर लाऊ, असं राज ठाकरे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Russia-Ukrain War: “व्लादिमीर पुतिन युक्रेनविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करू शकतात” 

…अन् महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास भर रस्त्यात चोपलं; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

“चंद्रकांत पाटील भला माणूस, त्यांना हिमालयात सोडवायला मी पण जाणार”

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग”

आर. माधवनच्या लेकाचा देशाला अभिमान; केली ‘ही’ कामगिरी