पर्यटनस्थळांबाबत मोठा निर्णय, फिरायला जाणार असाल तर ही बातमी नक्की वाचा

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढताना पहायला मिळत आहे. कोरोना महामारीनं गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून सर्वांच्या आयुष्यात बदल केले आहेत. अशातच आता राज्यात अनेक क्षेत्रांमध्ये निर्बंध लावण्यात येत आहेत.

राज्यात गेल्या दीड वर्षांपासून बंद असणारे पर्यटन स्थळं काही महिन्यांपूर्वीच पुन्हा सुरू करण्यात आली होती. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनानं यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

पुणे भागात अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. गड किल्ले, निसर्गरम्य ठिकाणांमुळं पुण्याच्या आजुबाजुला कायम गर्दी असते. मनमोहक निसर्ग पुण्याकडं सर्वांनाच आकर्षित करत असतो.

पुणे भागातील पर्यटन स्थळांवर येण्यास पर्यटकांना आता बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनानं याबाबतचे आदेश जारी केले आहेत. परिणामी आता पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटता येणार नाही.

पुणे जिल्हा प्रशासनानं गर्दी होवू नये आणि कोरोना नियमावलीचं पालन व्हावं म्हणून पर्यटनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना पर्यटनासाठी परवानगी मिळणार नाही.

पुणे जिल्हा प्रशासनाकडून खालील पर्यटन स्थळांवर पर्यटनास बंदी घातली आहे.

मावळ तालुका – भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर या सर्व ठिकाणांवर पर्यटनास कोरोना काळात बंदी असेल.

मुळशी तालुका – लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, काळवण इत्यादी ठिकाणी बंदी असेल.

हवेली तालुका – घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण भाग.

आंबेगाव तालुका – डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ .

जुन्नर तालुका – शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र.

भोर तालुका – रोहडेश्वर-विचित्र गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड.

वेल्हा तालुका – तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर.

वरील सर्व ठिकाणी पर्यटनाला प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंदी असेल. परिणामी पर्यटकांना आता प्रशासनाच्या पुढील आदेशाची वाट पहाण्याशिवाय काही पर्याय शिल्लक नाही.

दरम्यान, सध्या राज्यभरात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सरकार कोरोनामुळं जास्त हानी होवू नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 “शरद पवारांची कुणाला अ‍ॅलर्जी असण्याचं काम नाही”

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल 

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद

“अभिनंदन, राज्याचा महसूल घटवून तुम्ही शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलंत” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, सरकारने ‘या’ नियमात केला बदल