कौतुकास्पद! आयसीयूमध्ये अभ्यास करत शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर

नाशिक | आजकाल आपण अनेक लोकांच्या यशस्वी होण्याच्या गोष्टी ऐकत असतो. काहींचा प्रवास खूप खडतर असतो, तर काहींना नशिबाची साथही असते. परंतू शिखर गाठण्याचे प्रत्येकाचे मार्ग हे वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे आपल्या हातांच्या रेषा हे आपलं भविष्य सांगत असतात.

ते जाणून घेण्यासाठी अनेकजण ज्योतिषाकडे जाऊन आपल्या नशिबात पुढे काय वाढवून ठेवलं आहे. हे जाणून घेण्यासाठी जातात. काहींना यासगळ्यावर खूप विश्वासही असतो. असंच एकदा नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने ज्योतिषाचं भविष्य खोट ठरवत, कलेक्टर होऊन दाखवलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील नवीबेज गावातील नवजीवन विजय पवार याचा कलेक्टरपर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. नवजीवन हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याने लहानपणीच आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचंय हे ठरवलंच होतं. बारावी झाल्यानंतर त्यानी सिव्हिल इंजिनियरिंग पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला.

2017 जून महिन्या नवजीवन परिक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी दिल्लीला गेला. जून 2018 मध्ये होणाऱ्या पूर्व परिक्षेसाठी त्यानं खूप मेहनत करायला सुरूवात केली. पूर्व परिक्षा दिल्यानंतर त्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये यश आलं. नवजीवननम ती परिक्षा पास केली.

त्यानंतर तो सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मुख्य परिक्षेच्या तयारीला लागला. परंतू त्याच्या समोर अचानक एक मोठं सकंट उभं राहिलं. परिक्षेला केवळ काही दिवसंच शिल्लक राहिले असताना, त्याला डेंगूची लागण झाली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दल्लीत त्याची प्रकृती सुधारत नसल्यानं, त्याच्या घरच्यांनी त्याला नाशिकला आणलं.

परिक्षेला केवळ 26 दिवसच बाकी राहिले होते. त्यावेळी नवजीवनचे वडिल विजय पवार यांनी त्याला सांगितलं की, तुझ्याकडे आता दोनच पर्याय आहेत. लढायचं की आलेली परिस्थिती पाहून रडायचं. त्यानंतर नवजीवनने लढायचं ठरवलं. उपचार सुरू असतानाच त्याने आयसीयूमध्ये त्याचा अभ्यास सुरू केला.

आयसीयूमध्ये त्याच्या एका हाताला सलाईन असायची तर दुसऱ्या बाजूला त्याच्या अभ्यासाची पुस्तकं. हॉस्पिटलमध्ये असताना नवजीवनला त्याची बहिण त्याला त्याच्या नोट्स बनवून दिल्या. तसेच दिल्लीतील त्याचा एक मित्र त्याची व्हिडीओ कॉल करून परिक्षेची तयारीही करून घेत होता.

परिक्षेला फक्त 13 दिवस बाकी असताना नवजीवन दिल्लीला परत गेला. रूमवर गेल्यानंतर त्याच्या मित्राने त्याला मानसिक धीर दिला. एवढा खडतर प्रवास करूनही नवजीवनच्या मागचं सकंट दूर होत नव्हतं. त्यानंतर त्याचा फोन हरवला त्या दरम्यान त्याला कुत्रही चावलं. हे सगळं पाहून त्याच्या मित्राने त्याला एका ज्योतिषाकडे नेलं.

त्यावेळी ज्योतिषाने त्याचा हात पाहिल्यानंतर तू 27 व्या वर्षी आयएएस बनू शकत नाहीस. परंतू ज्योतिषाच्या शब्दांना न जुमानता नवजीवनने आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवत त्या 2018 ची मुख्य परिक्षा दिली. त्यामध्ये त्याची संपूर्ण देशात 360वी रँक आली. नवजीवनचा हा प्रवास अनेक तरूणांना प्रेरणादायी ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

माकडाशी पंगा घेणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

अभिनेता सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली ‘ही’ खंत

भर मंडपात ब्राम्हणाने नवरीसोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

बिबट्यानं हरणावर केला हल्ला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ