Top news देश

कौतुकास्पद! चिमुकल्यानं सायकलसाठी जमवलेले खाऊचे पैसे दिले कोरोनाग्रस्तांच्या मदतीला

नवी दिल्ली| मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशा संकट काळात अनेक मदतीचे हात पुढे सरसावताना दिसत आहे. यातच एका चिमुकल्यानं आपल्या सायकलसाठी जमवलेले पैसे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिले असल्याचं समोर येत आहे.

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पैसे दिलेल्या या चिमुकल्याचं नाव आहे हरीश वर्मन. तामीळनाडूतील मदुराई शाळेत दुसरीत शिकत असलेला हरीश वर्मन वडिलांनी दिलेले खाऊचे पैसे आपल्या पिगी बॅंकमध्ये साठवत होता. त्याला या पैश्यातून सायकल घ्यायची होती.

पण देशातील नागरिकांची औषधे आणि मदतीवाचून होणारी तडफड या चिमुकल्या विद्यार्थ्याला पाहवली नाही. त्याने तत्काळ आपली पिगी बँक तोडली आणि त्यात जमलेले एक हजार रुपये आपल्या वडिलांमार्फत तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधीला पाठवले.

हरीशच्या या कृतीनं त्याचं अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे. उत्तर मदुराईचे डीएमके आमदार थलपती यांनी डीएमके कार्यकर्त्यांसह दानशूर हरीशच्या घरी जाऊन त्याचे खास अभिनंदन केले. एवढंचं नाहीतर त्यांनी चिमुकल्या हरीशला एक नवी सायकलही भेट म्हणून दिली.

दरम्यान, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी फोन करीत हरीशचे अभिनंदन केले.

महत्वाच्या बातम्या – 

धक्कादायक! कार खरेदी करण्यासाठी आई-वडिलांनी आपल्या नवजात…

चक्क कोंबडाही बोलतोय अल्लाह अल्लाह; पाहा व्हायरल होणारा…

कोरोना झालेल्या आईला कोणीही खांदा द्यायला तयार नाही म्हणून…

कौतुकास्पद! पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीने केली…

चक्रिवादळाचा इशारा; महाराष्ट्रातील ‘या’ भागात…