कौतुकास्पद! आई-पत्निचे दागिने गहाण ठेवत पुण्यात उभारलं कोव्हिड सेंटर, रुग्णलयाला दिलं ‘हे’ नाव

पुणे| संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

अशातचं पुण्यातील एका तरुणाने ‘कोव्हिड योद्धा’ नावाला साजेशी कृती केली आहे. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुण्यातील धानोरी याठिकाणी 53 बेडचं रुग्णालय उभारलं आहे. हे रुग्णालय अवघ्या सात दिवसांत उभारलं असून त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे आणि आईचे दागिणे गहाण ठेवले आहेत.

कोरोना काळात लोक बेड मिळवण्यासाठी धडपड करत आहेत तोच दुसरीकडे उमेश चव्हाण यांनी उभारलेल्या पुण्यातील रुग्णालयासाठी सर्व स्तरातून कौतुकं होतं आहे.

विशेष म्हणजे  त्यांनी या रुग्णालयाला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कोव्हिड-19 हॉस्पिटल असं नाव दिलं आहे.

याविषयी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की, राज्यात सध्या कोरोना रुग्णांची वाढ झपाट्यानं होतं आहे. अशात लोकांना बेड मिळत नाहीयेत. अशा स्थितीत कोरोना रुग्ण आजाराला घाबरण्यापेक्षा बेड आणि औषधाच्या तुटवड्याला जास्त घाबरत आहेत. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये अधिकचं भीतीचं वातावरण तयार होतं आहे. त्यामुळे आम्ही स्वतः चं रुग्णालय उभं केलं आहे. यासाठी अनेक अडचणी आल्या. ‘

हे रुग्णालय उभं करण्यासाठी त्यांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर त्यांनी त्यांच्या घरातील आईचे आणि पत्नीचे मिळून एकूण 35 तोळे सोनं गहाण ठेवून तीस लाखांची जुळवा जुळव केली आहे. लोकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी अवघ्या सात दिवसांत 53 बेडचं हे प्रशिस्त कोव्हिड रुग्णालय उभं केलं आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

आश्चर्यकारक! 25 वर्षीय ‘या’ महिलेने दिला चक्क नऊ…

पदर सावरत आजी म्हणाली ‘सोचेंगे तुम्हे प्यार कर के…

निष्काळजीपणा भोवला! कोरोना काळात मतदान करण्यासाठी…

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास सीटी स्कॅनची गरज नाही, अन्यथा…

अभिनेत्री अमृता खाणविलकरचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर…