कौतुकास्पद! वाॅकरशिवाय चालताही न येणारा ‘हा’ डाॅक्टर कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी झटतोय

मुंबई| देश सध्या कोरोनाशी मोठी लढाई लढतोय. कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

अशा संकट काळात अनेकजण प्रेरणादायी कामगिरी बजावताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत एका डाॅक्टरांचं काम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरताना दिसत आहे.

राज्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची प्रचंड कमतरता जाणवत आहे. अशा बिकट परिस्थितीत वॉकरशिवाय चालूही न शकणारे डाॅ. अशोक गीते यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता कोरोनाग्रस्तांसाठी मदत करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूच्या भीतीनं अनेकांनी वैद्यकीय क्षेत्राला रामराम ठोकला आहे. यातच डाॅ. अशोक गीते देशात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यापासून ते कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. ते सध्या मीरा भोईंदर महापालिका क्षेत्रातील पंडित भीमसेन रुग्णालयात कार्यरत आहेत. ते वॉकरच्या साह्याने प्रत्येक कोरोना वॉर्डात जाऊन रुग्णांवर उपचार करत आहेत.

डाॅ. अशोक गीते यांनी नुकतच कोरोना विषाणूवर मात केली, मात्र कोरोना विषाणूवर घेतलेल्या औषधांचा त्यांच्या आरोग्यावर साइट इफेक्ट झाला आहे. परिणामी त्यांना हिपज्वाईंडमध्ये एवैस्कुलर नेकरोसिस या दुर्धर आजारानं ग्रासलं आहे.

2021 मध्ये डाॅ. अशोक गीते यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना चालण्याची समस्या उद्भवली. या समस्येमुळे गीते यांना वाॅकरच्या आधारानं चालावं लागत आहे. वाॅकरशिवाय एक पाऊलही टाकणं त्यांना जड जात आहे.

शस्त्रक्रियेनंतर गीते यांना आराम करण्याची गरज असताना ते रुग्णालयात रुजू झाले. वाॅकरच्या सहाय्यानं रुग्णालयातच जाऊन ते कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. अशा सकारात्मक कामामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

‘तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं…’…

मराठमोळ्या बाॅडिबिल्डरचं कोरोनामुळे निधन, 34व्या वर्षी घेतला…

धक्कादायक! ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे…

‘दोस्ताना 2’ नंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन…

‘मला आणि माझ्या कुटूंबाला भाजपकडून जीवे मारण्याच्या…