कौतूकास्पद! सेक्स वर्कर्सच्या मुलांसाठी गौतम गंभीरने उचललं मोठं पाऊल!

मुंबई | कोरोनाकाळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. या लॉकडाऊनचा प्रभाव सेक्स वर्कर्सच्या जीवनावर देखील पडला आहे. सेक्स वर्कर्स सोबतच त्यांच्या मुलांना देखील दोन वेळच्या अन्नासाठी त्रस्त व्हावं लागतंय. आता भारतीय क्रिकेट टीमचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर या मुलांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

सेक्स वर्कर्सच्या मुलांच्या मदतीसाठी गौतमने आता ‘पंख’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे गौतमने देहविक्री करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांना जेवण तर पुरवलंच आहे. मात्र त्याबरोबरच त्याने या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्थाही सामाजिक संस्थेमार्फत केली आहे.

पंख या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात गौतमने पंचवीस मुलांची जबाबदारी घेतली आहे. यामध्ये तो त्या मुलांच्या जेवणाबरोबरच त्यांच्या शिक्षणाचीही व्यवस्था करणार आहे. या मुलांना त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी गौतम प्रयत्न करत आहे.

दरम्यान, आपल्या समाजामध्ये सेक्स वर्कर्सच्या मुलांकडे अत्यंत किळसवाण्या नजरेनं पाहिलं जातं. त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. समाजातील हाच भाव बदलण्यासाठी गौतमने हे पाऊल उचललं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बिहारच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच राजकीय षडयंत्र- जितेंद्र आव्हाड

‘तो क्षण जेव्हा मी त्याला हो म्हणाले..’; सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केली गोड आठवण

राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी योगदान दिलं आहे; भाजपच्या ‘या’ खासदाराचा घरचा आहेर!

‘…म्हणून मी अजूनही कोरोना पॉझिटिव्ह’; अभिषेक बच्चनने सांगितले कारण!

मॉलला परवागनी मग जिमला का नाही?; सलमान खानच्या मराठमोळ्या ट्रेनरचा सरकारला प्रश्न!