कौतुकास्पद! बायकोचे दागिने विकून पठ्ठ्यानं रिक्षाला बनवलं रुग्णवाहिका

भोपाळ| देश सध्या कोरोनाशी मोठी लढाई लढतोय. कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

अशा संकट काळात अनेकजण पुढे येऊन मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे. यातच भोपाळमधील जावेद खान याने समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.

भोपाळमध्ये रिक्षा चालवणाऱ्या जावेद खानने पत्नीचे दागिने विकून रिक्षेला रुग्णवाहिका बनवलं. या रिक्षातून रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही, त्यांना रुग्णालयात पोहोचवण्याचं काम जावेद करत आहे. त्याच्या कामामुळे सोशल मीडियावर त्यांचं खूप कौतुक केलं जात आहे.

जावेदने न्यूज एजन्सी एएनआयला सांगितलं की, मी सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्सवर पाहिलं की, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने लोकांना रुग्णालयात पोहोचायला अडचणी येत आहेत. यानंतर मी हे काम करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मला माझ्या पत्नीचे दागिने विकावे लागले.

ऑक्सिजनसाठी मी दररोज रिफील सेंटरच्या बाहेर रांगेत उभा राहतो. मी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून हे काम करीत आहे. यादरम्यान मी 9 गंभीर रुग्णांना रुग्णालयात पोहोचवलं आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

कोरोना योद्धाला सलाम! कोरोनाने आई, वडिल, भावाचा मृत्यू तरीही…

IPL 2021: पंजाब किंग्सचा आरसीबीवर दणदणीत विजय

कौतुकास्पद! वाॅकरशिवाय चालताही न येणारा ‘हा’…

‘तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं…’…

मराठमोळ्या बाॅडिबिल्डरचं कोरोनामुळे निधन, 34व्या वर्षी घेतला…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy