कौतूकास्पद! सासू-सासऱ्यांनी केलं सूनेचं कन्यादान; ‘या’ अनोख्या विवाहाची सगळीकडे चर्चा

बुलडाणा | सूनेचा मुलीप्रमाणे सांभाळ करणाऱ्या सासू-सासऱ्यांनी मुलाच्या नि.धनानंतर तिचा विवाह लावून दिल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. महिलांवरील छ.ळाच्या बातम्या समोर येत असताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे.

बुलडाण्यात सासू सासऱ्यांनी सूनेचं कन्यादान केलं आहे. आपल्या सुनेचं कन्यादान करून त्यांनी एक आदर्श प्रस्थापित केलाय. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या ठिकाणी ही घटना घडली. त्यामुळे या विवाहाची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

सुनगावमधील संतोष शालिग्राम वानखडे या तरुणाचा 16 मार्च 2020 मध्ये धामणगाव तालुका संग्रामपूर येथील राधा उमाळे या तरुणीसोबत विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही महिन्यातच संतोष शालिग्राम वानखडे यांचा विहिरीत पडून दुर्देवी मृ.त्यू झाला. त्यांनंतर राधा आपल्या सासू-सासऱ्यांसोबत सासरीच राहत होती.

राधा सात ते आठ महिने सासरी राहत होती. राधाच्या सासू-सासऱ्यांनी एक चांगला मुलगा पाहून 6 मार्च रोजी तिचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्‍न राजनकार यांच्याशी करुन दिला. त्यामुळे गावभरात वानखडे दाम्पत्यांचं कौतुक केलं जात आहे.

कोरोनाचे सर्व निर्बंध पाळत छोटेखानी नोंदणी पद्धतीचा विवाह सुनगाव येथे पार पाडला. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.

महत्वाच्या बातम्या –

‘तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही’ – राज ठाकरे

रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्यामागचे सांगितले कारण, म्हणाले…

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना ‘ही’ अनोखी भेट, पाहा व्हिडीओ

आज सोन्याच्या दरात इतक्या’ रुपयांची वाढ, पाहा काय आहेत दर

रोज गुळ खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे