Top news देश

कौतुकास्पद! मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय ‘हे’ काम

नवी दिल्ली| मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लोटेने तर मृत्युचे तांंडवच चालवले आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यांत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

अशातच एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. ओडीसा राज्याची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमधील मधुस्मिता प्रुस्टी या नर्स काम करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मधुस्मिता स्मशानात कोरोना संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

मधुस्मिता कोलकाता येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पॅनडेमिक डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. 2011 ते 2019 पर्यंत तिने इथे नोकरी केली. यानंतर तिने निर्णय घेतला की, ती बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आपल्या पतीची मदत करेल. कारण त्यांच्या पायाला जखम झाली होती. ती 2019 मध्ये ओडिशामध्ये परत आली आणि बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करू लागली.

गेल्यावर्षी म्हणजेच 2020 मध्ये जवळजवळ 300 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलं असल्याचं मधुस्मिता यांनी सांगितलं. महिला असूनही अंत्यसंस्कार करते म्हणून समाजाच्या टीकेचा सामनाही करावा लागला. पण त्या कधीही मागे हटल्या नाहीत. त्या प्रदीप सेवा ट्रस्ट अंतर्गत काम करतात. या ट्रस्टचं नाव तिच्या पतीच्या नावावर आहे.

दरम्यान, मधुस्मिता कोरोना संकटात हा निर्णय घेतला कारण संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक घाबरत आहे. त्यांना कोरोना होण्याची भीती असल्याने ते असं करत आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

धक्कादायक! कोरोना नष्ट करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा…

2 वर्षाच्या चिमुरड्यासह विवाहित प्रेयसी पोहोचली थेट…

‘या’ विवाहित दिग्दर्शकाला हृदय देऊन बसली होती…

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी मुलीचे…