Top news देश

कौतुकास्पद! माणसाने तहानलेल्या कुत्र्याची ‘या’ प्रकारे भागवली तहान, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@TheFigen

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात.

आपल्याला माहित आहे की, माणसाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. ज्या गोष्टींसाठी कित्येक दिवस लागायचे आता त्याच गोष्टी काही मिनिटांमध्येच होतात. परंतू या सगळ्यामध्ये माणसामधील माणूसकी नावाची गोष्टी संपुष्टात आली आहे.

परंतू अशातच याच संदर्भातील म्हणजेच माणसातील माणूसकी अजूनही शिल्लक असल्याचा पुरावा देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने एका कुत्र्याची तहान भागवली असल्याचं पाहायला मिळतं आहे. एका ठिकाणी काही माणसं पाणी पित आहेत. त्यांच्याच बाजूला एक रस्त्यावरील कुत्रा त्याच्याकडं निरागसतेनं पाहत आहे.

हे त्या ठिकाणी असलेल्यांपैकी एकाच्या लक्षात येतं आणि त्यातील एक व्यक्ती आपल्या हाताची ओंजळ करून त्यामध्ये पाणी घेतो. त्यानंतर तो त्या कुत्र्याजवळ जातो आणि त्याला आपल्या हातातील पाणी पाजत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 96 हजार लोकांनी पाहिला आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या कमेट्समध्ये काहींनी व्हिडीओमधील व्यक्तीची पाठ थोपटली आहे.

महत्वाच्या बातम्या-

तरूणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘आनंद पोटात माझ्या मावेना’ म्हणत भर मंडपातच नवरी झाली सुरू, पाहा व्हिडीओ

काय सांगता! साडी घातली म्हणून महिलेचा हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, पाहा व्हायरल व्हिडीओ

जेवायला मिळालं नाही म्हणून नवरीने स्वत:च्याच लग्नात केला राडा, पाहा व्हिडीओ

केसाला आग लागली तरी महिला करत राहिली काम अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ