कौतुकास्पद! खुद्द पंतप्रधानांनी देखील रस्त्यावर गाणी गाणाऱ्या ‘या’ तरुणांना नावाजलं; पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचं एक माध्यम समजलं जातं. अनेक कलाकारांच्या सुप्तगुणांना सोशल मीडियामुळे वाव मिळत असतो. सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओजने कित्येक लोकांचं आयुष्य देखील बदलून टाकलं आहे.

भारतीय संस्कृतीच्या इतिहासात जाऊन पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या कलांनी इथे जन्म घेतला आहे. मग ते पुरातन वाद्य वाजवणे असो किंवा संस्कृतीची थोरवी गाणारी जुनी गीते असोत. आजही भारतीय संस्कृतीचे कित्येक पहारेकरी हा वारसा जपत आहेत.

याचेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील या कलाकारांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन तरुण आपल्या वाद्यांसोबत भगवान शंकराचं गाणं म्हणत उभे असलेले दिसत आहेत. हे दोन तरुण दारोदार हिंडत आपली कला दाखवत चार पैसे कमवत असतात.

रस्त्यावर या दोन तरुणांना गाणं म्हणताना पाहून एका गृहस्थाने त्यांना आपल्या घरी बोलावलं आहे. त्याच गृहस्थाच्या अंगणात हे दोन तरुण गाणं म्हणत आहेत. त्या गृहस्थाच्या कुटुंबातील इतर लोक देखील तेथे उपस्थीत आहेत.

हे दोघे ‘भोला है भंडारी’ हे महादेवाचं गीत गात आहेत. या तरुणांचा आवाज अगदी मंत्रमुग्ध करून टाकतो. हे दोन कलाकार महादेवाची स्तुती सांगणारे इतरही काही गाणी गातात.

महादेवाची ही गाणी गात असताना या दोघांचं एकमेकांसोबत असलेलं अफलातून ट्युनिंग वाखाळण्याजोगं आहे. या दोघांचं हे गाणं अगदी काळजाला भिडतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या दोन तरुणांना डोक्यावर घेतलं आहे.

माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी एका यु ट्युब चॅनेलने हा व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दोघांचा व्हिडीओ शेअर करत त्यांची स्तुती केली होती. यानंतर दहा लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बॉलिवूडच्या ‘या’ खलनायक अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

दोन लग्न तुटल्यानंतर शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम…

कडाक्याच्या उन्हात हत्तीच पिल्लू पाण्यात पोहण्याचा आनंद कसं…

साडे सात लाख रुपयांसाठी तो विषारी सापांमध्ये झोपला…

काजोलच्या गाण्यावर मुलगी न्यासाचा जबरदस्त डान्स, पाहा…