कौतुकास्पद! तहानलेल्या माकडाची अशापद्धतीने तहान भागवली, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ  आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. तर काही व्हिडीओ पाहून त्यांनी केलेल्या कामगिरीची कौतुक करावं तितकं कमी असतं. आपण पाहतो जगात माणूसकी नावाची गोष्ट आजकाल संपत चालली आहे.

सर्वांकडे पैसा आल्यामुळे जोतो आप-आपल्या जगात वावरत असतो. कोणालाच कोणाची पर्वा नसते. परंतू सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात  व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ माणूसकीचे एक जिवंत उदाहरण म्हणायला काहीचं हरकत नाहीय. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका माकडाला आपल्या बाटलीने पाणी पाजत आहे. माकड ज्याप्रमाणे पाणी पित आहे, त्यावरून असं दिसतं आहे की माकडाला खूप जास्त प्रमाणात तहान लागली आहे.

माकड पाणी पित असतानाच, दुसरं माकड त्याच्या त्या माकडाच्या जवळ येऊन त्याच्या हातातील पाण्याची बोटल आपल्या हातात खेचून घेतल्याचं दिसतं आहे. दुसऱ्या माकडालाही तहान लागल्यामुळे तेही पाणी मागतं आहे. हे पाहून तो व्यक्ती त्यालाही बोटलने पाणी पाजतो.

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘In a world where you can be anything, be kind’ अशाप्रकारचं कॅप्शन दिलं आहे. तसेच या व्हिडीओला अनेक वेगवेगळ्या कमेंट येत असून, आत्तापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ 45 हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

IPL 2021: दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सनं दमदार विजय, पाॅईंट…

IPL 2021: यंदाची आयपीएल विराट जिंकणार??? आरसीबीच्या विजयाची…

‘मीदेखील खूप काही बोलू शकतो पण…..’ अनुषा…

लग्न करून देखील आयुष्यभर एकटी राहिली ‘ही’…

जोरजोरात ओरडत ‘या’ महिलेने शोकसभेतच काढले कपडे;…