वाईन, बियर आणि व्हिस्कीमध्ये नेमका फरक काय?, वाचा सविस्तर माहिती

मुंबई | ठाकरे सरकारच्या एका निर्णयानं राज्यात मोठा गोंधळ सुरू झाला आहे. सरकारवर चक्क दारू विक्रीला प्रोत्साहन देत असल्याची टीका विरोधक करत आहेत.

ठाकरे सरकारनं महसूल वाढवण्यासाठी आणि राज्यातील द्राक्षं उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. परिणामी गोंधळ निर्माण झाला आहे.

राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्यास सरकारनं परवानगी दिली आहे. परिणामी पुन्हा वाईन, बियर, व्हीस्की यांच्या फायदा आणि तोट्याची चर्चा सुरू झाली आहे.

वाईन, व्हिस्की आणि बियर या तिन्ही मद्याच्या प्रकारात अल्कोहोल असतं. अल्कोहोलचं प्रमाण कमी अधिक असल्यानं आणि बनवण्याचा अंदाजही वेगळा असल्यानं नेहमी या मद्यांची चर्चा होते.

बियर या मद्याच्या प्रकारात 3 ते 30 टक्के अल्कोहोल असतं. पण लाईट बियर आणि स्ट्राॅंग बियरमध्ये हे प्रमाण कमी अधिक असतं. लाईट बियरमध्ये 4 टक्के आणि स्ट्रॅंग बियरमध्ये 8 टक्के अल्कोहोल असतं.

जर्मनीमधील बियर ही अतिशय चांगली बियर मानली जाते. मका, गहू आणि धान्याला काही प्रमाणात अंबवून घेतले जाते. बियर तयार करण्यासाठी एक ते दोन आठवडे इतका कालावधी लागतो.

वाईन हा दारूचाच एक प्रकार मानला जातो. फळांच्या रसापासून वाईन तयार केली जाते. वाईनमध्ये 9 ते 18 टक्के अल्कोहोलचं प्रमाण असतं. वाईनला साधारणपणे रंगाच्या नावानं संबोधल जातं. फ्रान्समध्ये सर्वाधिक वाईन तयार केली जाते.

वाईन तयार करण्यासाठी द्राक्ष हे सर्वात जास्त महत्त्वाचं माध्यम आहे. द्राक्षांच्या क्षमतेवरून आणि प्रकारावरून वाईनचं नाव ठेवलं जातं. रेड वाईन किंवा व्हाईट वाईन या नावानं वाईनला संबोधलं जातं.

व्हिस्की घेणाऱ्या मद्यप्रेमींची सध्या अधिक आहे. गहू आणि धान्याच्या वापरापासून व्हिस्की बनवली जाते. व्हिस्कीत अल्कोहोलचं प्रमाण हे अधिक असतं. 30 ते 65 टक्के प्रमाणात व्हिस्कीत अल्कोहोलचं प्रमाण असतं.

दरम्यान, राज्य सरकारनं वाईनला किराणा आणि सुपर मार्केटमध्ये विक्रीची परवानगी दिल्यानं राज्यातील मद्यप्रेमींमध्ये आनंद असला तरी राज्यात राजकारण मात्र पेटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “ठाकरे सरकारला फक्त दारुड्यांची काळजी, उद्याची पिढी जर…”

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! आता किराणा दुकांनामध्ये वाईन मिळणार

आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी

टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता

मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश