जाहीरातदार बीसीसीआयवर भडकले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

मुंबई | क्रिकेटचा सर्वाधिक रोमांचकारी प्रकार असलेल्या ट्वेंटीचा कुंभ म्हणून ओळखली जाणारी आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे.

तब्बल दहा संघांमध्ये चुरशीच्या होत असलेल्या स्पर्धेला जागतिक स्वरूप आलेलं आहे. अशातच आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

आयपीएलच्या माध्यमातून  बीसीसीआयला दरवर्षी हजारो कोटींचा फायदा होत असतो.  प्रसारण हक्क, मीडिया हक्क, जाहीरात हक्क यांमधून बीसीसीआयला कोट्यावधी मिळतात.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात टिव्ही रेटिंगमध्ये चांगलीच घसरण झाल्याचं दिसत आहे. परिणामी आता जाहीरातदार नाराज झाले आहेत.

आयपीएलच्या प्ले ऑफसाठी महत्त्वाचे असलेले सामने या आठवड्यात खेळवण्यात आले पण ते देखील टिव्ही रेटिंगमध्ये सुधारणा करू शकले नाहीत.

7 मे ते 13 पर्यंत आयपीएल आपल्या पाचव्या आठवड्यात देखील निच्चांकी रेटिंगवर आहे. बार्कच्या रेटिंगनूसार आता बीसीसीआय काय पावले उचलणार हे पाहावे लागणार आहे.

जाहीरातदार आता बीसीसीआयकडून भरपाई मागत आहेत. डिस्ने हाॅटस्टार आणि स्टार स्पोर्टमध्ये देखील आता महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! दाऊद प्रकरणात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

 आयपीएलच्या पुढील हंगामात चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा धोनीच

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘नवरात्री आणि मांसाहार…’; सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

‘जनतेचे मुख्य प्रश्न टाळण्यासाठीच राज ठाकरे…’; नाना पटोलेंचा प्रहार