अहमदनगर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काल(शनिवार) अहमदनगरमध्ये सभा होती. ती आटोपल्यानंतर शरद पवार नगरच्या बाहेर पडताच राष्ट्रवादीकडून निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
राष्ट्रवादीतील पडझडीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी शरद पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत, नगरमध्ये राष्ट्रावादीला या सगळ्याचा फटका बसला होता. त्यामुळे पवारांच्या नगर दौऱ्याला विशेष महत्त्व होतं. अभिषेक कळमकर आणि राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष किरण काळे हे नगरमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
संग्राम जगताप यांच्या आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. विशेष म्हणजे शरद पवारांच्या स्वागतासाठी उभारलेल्या कमानीखालीच हा सगळा प्रकार घडला. धक्काबुक्की झाली.शिवीगाळ करण्यात आली. एकमेकांवर चपला भिरकावण्यात आल्या.
जगताप आणि कळमकर गटात हाणामारी सुरू असतानाच तिथं पोलीस पोहोचले. कळमकर व काळे यांना पोलीस स्टेशनला नेलं. अभिषेक कळमकर आणि किरण काळे यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं.
नगरमधल्या कोतवाली पोलीस स्टेशनला सगळे गट समोर आल्याने तणाव निर्माण झाला. त्यानंतर मात्र आमच्यात काही झालंच नाही, असं दाखवत पोलिस स्टेशनमधून बाहेर पडले.
महत्वाच्या बातम्या-
85 वर्षीय सुधाकरपंतांनी शड्डू ठोकल्याने भारत भालकेंच्या अडचणीत वाढ! https://t.co/YveVMvzvY2 @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेला ‘हा’ नेता थेट तुरूंगातून लढवणार निवडणूक – https://t.co/6d553fRvsy @NCPspeaks @BJP4Maharashtra @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
“महाराष्ट्राचा सह्याद्री अभेद्य पाठीशी… आम्हाला काय कुणाची भिती”https://t.co/N8MOcKG3gi @dhananjay_munde @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019