तब्बल 9 वर्षांनंतर श्रीसंतला विकेट मिळाली, मैदानावर केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारताचा जलदगती गोलंदाज श्रीसंत (Sreesanth) शेवटचा आयपीएल सामना 2013 मध्ये खेळला होता आणि त्यानंतर फिक्सिंगमध्ये गुंतल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

यानंतर न्यायालयाने त्याच्यावर सात वर्षांची बंदी घातली होती. आता त्याच्यावरची बंदी संपली आहे. त्यामुळे आता श्रीसंतने पुन्हा नव्या जोमाने कमबॅक केलं आहे.

क्रिकेटच्या मैदानात परतल्यानंतर अखेरीस श्रीसंत रणजी सामन्यात परतल्याच पहायला मिळालं. तब्बल 9 वर्षानंतर श्रीसंतने गोलंदाजी करत पहिली विकेट पटकावली.

पहिला विकेट मिळाल्यानंतर श्रीसंतने मैदानात खेळपट्टीवर झोपून प्रणाम केला. त्याचा एक व्हि़डीओ शेअर करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

9 वर्षांनंतर माझी ही पहिली विकेट आहे. देवाच्या कृपेने मी खूप आनंदी होतो आणि विकेट घेतल्यानंतर मी खेळपट्टीला नमस्कार करत होतो, असं श्रीसंत म्हणाला आहे.

मेघालय विरूद्ध सामन्यात श्रीसंतला संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांने विकेट घेत आपल्यातलं अजूनही क्रिकेट जिवंत असल्याचं दाखवून दिलं आहे.

बाउन्सरला चकित करून फलंदाज आर्यन बोराला बाद करण्यात श्रीसंतने यश मिळवलं. या सामन्यात श्रीशांतने 12 षटकात 40 धावा देऊन 2 बळी घेतले. मात्र दुसऱ्या डावात त्याला विकेट घेता आली नाही.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या – 

रशियामुळे भारत-अमेरिकेचं बिनसलं?; बायडन यांची नाव न घेता भारतावर टीका

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता

 धोनीनं केलं ट्रॅफिक जॅम! भर रस्त्यात उभी केली बस अन्…; पाहा व्हिडीओ

“भाजपमुक्तीचा ‘लातूर पॅटर्न’ राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवा”

 ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका; विलिनीकरणाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय