विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

मुंबई | आठवडाभर धुवाधार बॅटींग केल्यानंतर गेले दोन चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या आठवड्यात राज्याला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला.

गेल्या दोन दिवसात मोजक्या ठिकाणीच पावसाच्या सरी बरसल्या. पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला असताना राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही हवामान खात्याने इशारा जारी केला आहे.

राज्यात मुंबई, कोकण, नाशिक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उघडीप दिल्यानंतर पाऊस पुन्हा बरसणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

मराठवाड्यातील जालना, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातीस पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली असताना आता पाऊस पुनरागमन करणार आहे.

दरम्यान, राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत असल्याने प्रशासनही सतर्क झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोजने सोशल मीडियावर आग, चर्चा तर होणारच; पाहा फोटो

‘आयत्या बिळावर नागोबा’, ओबीसी आरक्षणावरून भाजप-शिवसेनेत जुंपली

बंगला, पगार ते सुरक्षा; राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मूंना मिळणार ‘या’ सुविधा

अंबादास दानवेंच्या आरोपानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा