‘दिव्यांग प्रवासी डब्या’तून गरोदर महिलाही प्रवास करु शकतात…; अमित ठाकरेंच्या मागणीला यश

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी मुंबईच्या समस्यांवर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. त्यामध्ये अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं होतं. 

रेल्वे अधिकाऱ्याकडून अपेक्षित उत्तर मिळतं नसल्याने अमित ठाकरेंनी अखेर मनसेच्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं. अमित ठाकरेंनी मुंबईकरांसंबंधी महत्वाचे मुद्दे मांडले. 

गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची रेल्वे व्यवस्थापकांनी पवानगी दिली आहे. अमित ठाकरेंच्या मागणीवरुन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरोदार महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

रेल्वेमध्ये एकही महिला सुरक्षित नसल्याचं अमित ठाकरेंनी महाव्यवस्थापकांच्या नजरेत आणून दिलं होतं. सुरक्षेसाठी फक्त सीसीटीव्हीच नाही तर सुरक्षारक्षकही वाढवावे, अशी मागणी अमित ठाकरेंनी केली होती.

दर रविवारी मेगा ब्लॉक असतो. पावसाळ्यात सतत रेल्वे रखडलेली असते. यावर तोडगा काढावा आणि रेल्वेच्या संख्येत वाढ व्हावी, अशीही मागणी अमित ठाकरेंनी केली आहे.

पहिल्या दर्जाच्या डब्यात जर जास्त गर्दी असेल तर प्रथम श्रेणीतील प्रवासाच्या पासचा काय उपयोग आहे, असा सवालही त्यावेळी अमित ठाकरेंनी उपस्थित केला. 

महत्वाच्या बातम्या-

-विखेंना शह; सत्यजीत तांबे यांची शिर्डीतून उमेदवारीची मागणी

-पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’च्या शूटींगमध्ये व्यस्त???

-“राष्ट्रवादीचे गणेश नाईक आपलं सामाज्र वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत”

-रोहित शर्मा बरोबरच्या वादावर विराट कोहलीचा मोठा खुलासा!

-आता 11 वीच्या पुस्तकात ‘समलैंगिक विवाह आणि लिव्ह इन रिलेशनशीप’चा धडा!