कोरोनावर मात केल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापट म्हणाली…, पाहा व्हिडीओ

मुंबई |  गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला पाहायला मिळाला होता. परंतू फेब्रुवारीपासून कोरोना रोगाने पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसतं आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यादरम्यान अनेकांना कोरोनाची लागण होत असून, यामध्ये सर्वसामान्यांपासून ते स्टार कलाकारांनी कोरोनाची लागण झालेलं समजलं. काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीतलं क्यूट कपल उमेश कामंत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली होती.

याविषयी या दोघांनी आपल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. याकाळात ते स्वत:च्याच घरात क्वारंटाईन होते. मात्र त्यांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांना अक आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनासारख्या भय्यकर विषाणूवर त्यांनी मात केली असून उमेश आणि प्रिया कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.

तसेच प्रिया आपल्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सतत कोणत्याना-कोणत्या विषयांवर व्हिडीओ शूट करून ते आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत असते. कोरोनावर मात केल्यानंतर तिने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

प्रियाचा हा व्हिडीओ सोशल मिडीयवर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. प्रियाचा हा सकारात्मक व्हिडीओ सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

या व्हिडीओमध्ये प्रियाच्या हातात एक कप असून, ती ऐरणीच्या देवा… हे मराठी गाणं म्हणताना दिसतं आहे. कोरोना काळात तिला हे गाणं सुचलं असल्यानं तिनी हे गाणं म्हणत व्हिडीओ शूट करून, तो शेअर केला आहे. त्याचबरोबर व्हिडीओ पोस्ट करताना प्रियाने ‘गो कोरोना गो’ असं कॅप्शनही दिलं आहे.

तिच्या व्हिडीओला अनेकांकडून सकारात्मक कमेंट्स येत आहेत. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 32 हजार लोकांनी लाईक केलं आहे. तसेच अनेकांनी तिला पुढील तिच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

दरम्यान, कोरोनावर मात केल्यानंतर उमेश आणि प्रिया यांनी इंस्टाग्राम लाईव्हव्दारे चाहत्यांसोबत संवाद साधला. कोरोनाकाळात त्यांच्यावर केलेल्या प्रमासाठी आणि प्रार्थनांसाठी त्या दोघांने चाहत्यांचे आभार मानले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

महत्वाच्या बातम्या-

हाय गर्मी! ‘टकाटक’ गर्लच्या या लूकने चाहते…

‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स…’; व्येशा…

कोरोनाच्या विळख्यात सापडला ‘हा’ प्रसिद्ध…

इंधनांच्या किंमतींमुळे गाडी चालवणं परवडत नाही? मग…

ऐकावं ते नवलंच! नवरदेवाने भांगात कुंकू भरलं अन् नवरिने…