कोरोनावर मात केल्यानंतर आलिया भट म्हणाली…

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला पाहायला मिळाला होता. परंतू फेब्रुवारीपासून कोरोना रोगाने पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसतं आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यादरम्यान अनेकांना कोरोनाची लागण होत असून, यामध्ये सर्वसामान्यांपासून ते स्टार कलाकारांनी कोरोनाची लागण झालेलं समजलं. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने आपल्याला कोरोनाची लागण झाली होती.

ही माहिती तिने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना दिली होती. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. तुम्ही देखील तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा’, अशी पोस्ट तिने शेअर केली होती.

यानंतर तिचे चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत होते.  मात्र अशातच आलियाने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आलिया कोरोना मुक्त झाली असल्याचं तिने सांगितलं आहे.

यासंदर्भात तिने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट केली आहे. त्यासोबतच एक फोटोही पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने एक छानसं कॅप्शनही दिलं आहे. ‘the only time being negative is a good thing’ असं कॅप्शन तिने दिलं आहे.

या बातमीनंतर तिचे चाहत्यांना जीवात जीव आला आहे. तिचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये आलियाने निळ्या रंगाचा टिशर्ट पिंक लेअरमध्ये घातला असल्याचं दिसतं आहे.

आलिया सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सतत तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती फोटो किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सांगत असते.

दरम्यान, आलिया भटने 2012 साली करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इअर’ या चित्रपटामधून अभिनय श्रेत्रात पदार्पण केलं. तिने तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 2016 मध्ये तिला ‘उडता पंजाब’ या चित्रपटामधील भूमिकेसाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)


महत्वाच्या बातम्या-

12 वर्ष लहान असलेल्या करीनाशी लग्न का केलं? सैफ अली खाननं…

‘या’ अभिनेत्रीला एकदा सोडून दुसऱ्यांदा झाली…

रितेश देशमुखचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल,…

महिलेनं चक्क मगरीच्या जबड्याजवळ हात नेला अन्…, पाहा…

न्हाव्याने आधी मित्राचे केस कापले अन् त्यानंतरचा प्रकार…