दारू पाजून, जेवू घालून मेहुण्यानं काढला भाऊजीचा काटा, धक्कादायक कारण समोर

औरंगाबाद | नेवपूर येथील एका प्रकल्पाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. संबंधित मृतदेह नेमका कोणाचा याबाबत गूढ बनलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केल्यानंतर, श्वानही घटनास्थळीच घुटमळल्याने मारेकऱ्याचा काहीही सुगावा लागला नव्हता.

बहिणीचा छळ केल्याच्या कारणातून मेहुण्यानेच भाऊजींची निर्घृण हत्या (Brother in law killed sister’s husband) केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

घटनेच्या दिवशी मृत भाऊजी आणि मेहुणा एकत्र होते. त्यांनी एकत्र बसून मद्य प्राशन करत जेवण केलं होतं. जेवण झाल्यानंतर त्यांच्यात ‘तू माझ्या बहिणीला त्रास देतो’ या कारणातून वाद झाला होता.

यानंतर आरोपी मेहुण्याने आपल्या भाऊजींना गोड बोलून नेवपूर येथील प्रकल्पाच्या खाली घेऊन गेला. आरोपी मेहुण्याला ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

कडुबा विठ्ठल साळुंखे असं हत्या झालेल्या भाऊजीचं नाव असून ते कन्नड तालुक्यातील चिमणापूर येथील रहिवासी आहे. तर सोमीनाथ राजधर खांदवे असं संशयित आरोपीचं नाव आहे.

धारदार शस्त्राने शरीरावर वार केले. याप्रकरणी पाशेर पोलिसांनी अखेर घटनेचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी आरोपी मेहुणा सोमीनाथ राजधर खांदवे याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

काँग्रेसला एवढा आत्मविश्वास कुठून येतो?- संजय राऊत 

अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकरांनी घेतली स्पष्ट भूमिका, म्हणाले… 

मोठी बातमी! अर्थमंत्र्यांबरोबर महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री सादर करणार बजेट!  

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महत्वाची माहिती समोर! 

“कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने सर्दी-खोकला गायब होतो”