फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या…

मुंबई | राज्याच्या राजकारणात मागील 8 ते 10 दिवसांपासून हालचालींना वेग आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (Shivsena) 39 आणि 11 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह बंड केलं.

एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गट मिळून सरकार स्थापन करण्यासाठी पुढे आले. मात्र यावेळी देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्रीपद सांभाळतील, असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र, ऐनवेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) असतील, अशी घोषणा केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता यांनी पहिल्यांदाच ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमधून नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनःपूर्वक शुभेच्छा, असं अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

“बिचारे देवेंद्र फडणवीस…, केंद्राने त्यांचा शंकरराव चव्हाण केला” 

‘तुमच्यामुळे देशाची बदनामी झाली, टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा’; नुपूर शर्मांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं 

पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी 

सत्तेत येताच शिंदे-फडणवीसांचा ठाकरेंना धक्का; ‘या’ दोन निर्णयात बदल 

…तर मी देवेंद्र फडणवीसांना शाबासकी दिली असती- शरद पवार