मुंबई | Omicron चा फैलाव रोखण्यासाठी पुणे प्रशासन कामाला लागलंय. उद्यापासून पुण्यात टेस्टिंग (Testing) आणि ट्रेसिंगला (Trasing) सुरूवात करण्यात येणार आहे. तसेच बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश रूग्णालयांना देण्यात आले आहेत.
उद्यापासून प्रत्येक व्यक्तींच्या संपर्कातील मोहिमेला सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रमुख भगवान पवार यांनी दिली आहे. तसेच ऑक्सिजन बेड, हॉस्पिटलमधील बेडसंदर्भात पुरेसं नियोजन तसेच ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही पवार यांनी सर्व रूग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
पुणे शहरात 438 नागरिक परदेशातून नुकतेच परतले आहेत. त्यापैकी 370 नागरिक मनपा हद्दीतील आहेत. 370 पैकी 335 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. आतापर्यंत 267 नागरिकांची RT-PCR करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत पुण्यात एक, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, डोंबिवलीत एक, कर्नाटकात दोन, दिल्लीत एकाला आणि गुजरातमध्ये एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडची बेरीज करता पुणे (Pune) जिल्ह्यात देशातील सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत.
दरम्यान, सहा पैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तिघे नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते.
यात एक महिला महिला आणि त्यांचा 45 वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि 17 वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. 24 नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती, ज्या 18 वर्षाखालील तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, तर आणखी एक बाधित तरुण फिनलंडवरून आला होता.
दरम्यान, विमानतळावर आलेल्या प्रत्येक प्रवाश्याची आरटीपीसआर चाचणी केली जात आहे. तसेच आवश्यकता भासल्यास जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी सोबतच लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीये.
महत्वाच्या बातम्या-
साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक!
मोठी बातमी! Omicron चा धसका; ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
Corona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर
सावधान! ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका
“या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार, दरदिवशी रुग्णांची संख्या 1.5 लाखांवर जाईल”